1. {अडचणीच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून प्रार्थना} PS मी आपल्या वाणीने परमेश्वरास आरोळी मारतो;
मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो. |
3. जेव्हा माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला,
तेव्हा तू माझा मार्ग जाणला. ज्या मार्गात मी चाललो, त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे. |
4. माझ्या उजवीकडे न्याहाळून पाहा,
कारण तेथे माझ्याविषयी कोणी पर्वा करत नाही. मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची काळजी घेणारा कोणीच नाही. |
5. हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो;
मी म्हणतो, तू माझा आश्रय आहेस, जिवंताच्या भूमित तू माझा वाटा आहेस. |
6. माझ्या आरोळीकडे लक्ष दे,
कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडीव, कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत. |
7. मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी,
म्हणून माझा जीव बंदीतून काढ. नितीमान माझ्याभोवती जमतील, कारण तू माझ्याशी चांगला आहेस. PE |