मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1अडचणीच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून प्रार्थना }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]मी आपल्या वाणीने परमेश्वरास आरोळी मारतो; [QE][QS]मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो. [QE]
2. [QS]मी आपला विलाप त्याच्यासमोर ओततो; [QE][QS]त्यास मी आपल्या समस्या सांगतो. [QE]
3. [QS]जेव्हा माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला, [QE][QS]तेव्हा तू माझा मार्ग जाणला. [QE][QS]ज्या मार्गात मी चाललो, [QE][QS]त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे. [QE]
4. [QS]माझ्या उजवीकडे न्याहाळून पाहा, [QE][QS]कारण तेथे माझ्याविषयी कोणी पर्वा करत नाही. [QE][QS]मला कशाचाही आश्रय नाही; [QE][QS]माझ्या जिवाची काळजी घेणारा कोणीच नाही. [QE]
5. [QS]हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; [QE][QS]मी म्हणतो, तू माझा आश्रय आहेस, [QE][QS]जिवंताच्या भूमित तू माझा वाटा आहेस. [QE]
6. [QS]माझ्या आरोळीकडे लक्ष दे, [QE][QS]कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; [QE][QS]माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडीव, [QE][QS]कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत. [QE]
7. [QS]मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी, [QE][QS]म्हणून माझा जीव बंदीतून काढ. [QE][QS]नितीमान माझ्याभोवती जमतील, [QE][QS]कारण तू माझ्याशी चांगला आहेस. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 142 / 150
अडचणीच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून प्रार्थना 1 दाविदाचे स्तोत्र मी आपल्या वाणीने परमेश्वरास आरोळी मारतो; मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो. 2 मी आपला विलाप त्याच्यासमोर ओततो; त्यास मी आपल्या समस्या सांगतो. 3 जेव्हा माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला, तेव्हा तू माझा मार्ग जाणला. ज्या मार्गात मी चाललो, त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे. 4 माझ्या उजवीकडे न्याहाळून पाहा, कारण तेथे माझ्याविषयी कोणी पर्वा करत नाही. मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची काळजी घेणारा कोणीच नाही. 5 हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; मी म्हणतो, तू माझा आश्रय आहेस, जिवंताच्या भूमित तू माझा वाटा आहेस. 6 माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडीव, कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत. 7 मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी, म्हणून माझा जीव बंदीतून काढ. नितीमान माझ्याभोवती जमतील, कारण तू माझ्याशी चांगला आहेस.
Total 150 अध्याय, Selected धडा 142 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References