मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {अडचणीच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून प्रार्थना} [PS] मी आपल्या वाणीने परमेश्वरास आरोळी मारतो; [QBR] मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो. [QBR]
2. मी आपला विलाप त्याच्यासमोर ओततो; [QBR] त्यास मी आपल्या समस्या सांगतो. [QBR]
3. जेव्हा माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला, [QBR] तेव्हा तू माझा मार्ग जाणला. [QBR] ज्या मार्गात मी चाललो, [QBR] त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे. [QBR]
4. माझ्या उजवीकडे न्याहाळून पाहा, [QBR] कारण तेथे माझ्याविषयी कोणी पर्वा करत नाही. [QBR] मला कशाचाही आश्रय नाही; [QBR] माझ्या जिवाची काळजी घेणारा कोणीच नाही. [QBR]
5. हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; [QBR] मी म्हणतो, तू माझा आश्रय आहेस, [QBR] जिवंताच्या भूमित तू माझा वाटा आहेस. [QBR]
6. माझ्या आरोळीकडे लक्ष दे, [QBR] कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; [QBR] माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडीव, [QBR] कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत. [QBR]
7. मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी, [QBR] म्हणून माझा जीव बंदीतून काढ. [QBR] नितीमान माझ्याभोवती जमतील, [QBR] कारण तू माझ्याशी चांगला आहेस. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 142 / 150
स्तोत्रसंहिता 142:65
अडचणीच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून प्रार्थना 1 मी आपल्या वाणीने परमेश्वरास आरोळी मारतो; मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो. 2 मी आपला विलाप त्याच्यासमोर ओततो; त्यास मी आपल्या समस्या सांगतो. 3 जेव्हा माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला, तेव्हा तू माझा मार्ग जाणला. ज्या मार्गात मी चाललो, त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे. 4 माझ्या उजवीकडे न्याहाळून पाहा, कारण तेथे माझ्याविषयी कोणी पर्वा करत नाही. मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची काळजी घेणारा कोणीच नाही. 5 हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; मी म्हणतो, तू माझा आश्रय आहेस, जिवंताच्या भूमित तू माझा वाटा आहेस. 6 माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडीव, कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत. 7 मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी, म्हणून माझा जीव बंदीतून काढ. नितीमान माझ्याभोवती जमतील, कारण तू माझ्याशी चांगला आहेस.
Total 150 अध्याय, Selected धडा 142 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References