1. {सुटका आणि मार्गदर्शन ह्यांसाठी प्रार्थना} PS हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या विनवणीकडे कान दे.
तू आपल्या विश्वासाने आणि न्यायीपणाने मला उत्तर दे. |
3. शत्रू माझ्या जिवाचा पाठलाग करीत आहेत;
त्यांनी माझे जीवन धुळीस मिळवले आहे; पुरातन काळच्या मेलेल्यासारखे त्याने मला अंधकाराच्या स्थळी राहण्यास लाविले आहे. |
5. मी पूर्वीचे दिवस आठवतो;
मी तुझ्या सर्व कृत्यांवर मनन करतो; तुझ्या हाताने सिद्धीस नेलेल्या कामावर विचार करतो. |
7. हे परमेश्वरा, त्वरा करून मला उत्तर दे कारण माझा आत्मा क्षीण झाला आहे.
माझ्यापासून तू आपले मुख लपवू नकोस, किंवा लपवशील तर मी गर्तेत उतरणाऱ्यांसारखा होईन. |
8. सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे,
कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो. |
10. मला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास शिकव,
कारण तू माझा देव आहेस. तुझा चांगला आत्मा मला सरळपणाच्या देशात नेवो. |
12. तू आपल्या दयेने माझ्या शत्रूंचा नायनाट कर;
आणि माझ्या जीवनातील सर्व शत्रूंचा नाश कर, कारण मी तुझा दास आहे. PE |