1. {#1सुटका आणि समृद्धीसाठी प्रार्थना }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]परमेश्वर माझा खडक त्यास धन्यवाद असो, [QE][QS]जो माझ्या हाताला युद्ध करण्यास; [QE][QS]आणि माझ्या बोटास लढाई करण्यास शिक्षण देतो. [QE]
2. [QS]तो माझा दयानिधी व माझा दुर्ग, [QE][QS]माझा उंच बुरुज आणि मला सोडवणारा, [QE][QS]माझी ढाल आहे आणि मी त्याचा आश्रय घेतो; [QE][QS]तो लोकांस माझ्या सत्तेखाली आणतो. [QE]
3. [QS]हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी? [QE][QS]किंवा मनुष्य तो काय की तू त्याच्याविषयी विचार करावा? [QE]
4. [QS]मनुष्य एका श्वासासारखा आहे; [QE][QS]त्याचे दिवस नाहीशा होणाऱ्या सावलीसारखे आहेत. [QE]
5. [QS]हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर; [QE][QS]पर्वतांना स्पर्श कर आणि त्यातून धूर येऊ दे. [QE]
6. [QS]विजांचे लखलखाट पाठवून, माझ्या शत्रूला पांगवून टाक; [QE][QS]तुझे बाण मारून, त्यांचा पराभव करून त्यांना माघारी पाठव. [QE]
7. [QS]वरून आपले हात लांब कर; [QE][QS]महापुरातून, या परक्यांच्या हातून, [QE][QS]मला सोडवून वाचव. [QE]
8. [QS]त्यांचे मुख असत्य बोलते, [QE][QS]आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे. [QE]
9. [QS]हे देवा, मी तुला नवे गाणे गाईन. [QE][QS]दशतंतु वीणेवर मी तुझी स्तवने गाईन; [QE]
10. [QS]तूच राजांना तारण देणारा आहे; [QE][QS]तूच आपला सेवक दावीद याला दुष्टाच्या तलवारीपासून वाचवले. [QE]
11. [QS]मला या परक्यांच्या हातातून मुक्त कर व मला वाचव. [QE][QS]त्यांचे मुख असत्य बोलते; [QE][QS]आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे. [QE]
12. [QS]आमची मुले आपल्या तारुण्याच्या भरांत उंच वाढलेल्या रोपांसारखी आहेत. [QE][QS]आमच्या मुली राजवाड्याच्या कोपऱ्यातील कोरलेल्या खांबाप्रमाणे आहेत. [QE]
13. [QS]आमची कोठारे प्रत्येक प्रकारच्या वस्तुंनी भरलेली असावीत. [QE][QS]आणि आमच्या शेतात आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत. [QE]
14. [QS]मग आमचे बैल लादलेले असावेत; [QE][QS]दरोडे, धरपकड व आकांत [QE][QS]हे आमच्या रस्त्यात नसावेत; [QE]
15. [QS]ज्यांना असे आशीर्वाद आहेत ते लोक आशीर्वादित आहेत; [QE][QS]ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते आनंदी आहेत. [QE]