1. {सुटका आणि समृद्धीसाठी प्रार्थना} [PS] परमेश्वर माझा खडक त्यास धन्यवाद असो, [QBR] जो माझ्या हाताला युद्ध करण्यास; [QBR] आणि माझ्या बोटास लढाई करण्यास शिक्षण देतो. [QBR]
2. तो माझा दयानिधी व माझा दुर्ग, [QBR] माझा उंच बुरुज आणि मला सोडवणारा, [QBR] माझी ढाल आहे आणि मी त्याचा आश्रय घेतो; [QBR] तो लोकांस माझ्या सत्तेखाली आणतो. [QBR]
3. हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी? [QBR] किंवा मनुष्य तो काय की तू त्याच्याविषयी विचार करावा? [QBR]
4. मनुष्य एका श्वासासारखा आहे; [QBR] त्याचे दिवस नाहीशा होणाऱ्या सावलीसारखे आहेत. [QBR]
5. हे परमेश्वरा, तू आपले आकाश लववून खाली उतर; [QBR] पर्वतांना स्पर्श कर आणि त्यातून धूर येऊ दे. [QBR]
6. विजांचे लखलखाट पाठवून, माझ्या शत्रूला पांगवून टाक; [QBR] तुझे बाण मारून, त्यांचा पराभव करून त्यांना माघारी पाठव. [QBR]
7. वरून आपले हात लांब कर; [QBR] महापुरातून, या परक्यांच्या हातून, [QBR] मला सोडवून वाचव. [QBR]
8. त्यांचे मुख असत्य बोलते, [QBR] आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे. [QBR]
9. हे देवा, मी तुला नवे गाणे गाईन. [QBR] दशतंतु वीणेवर मी तुझी स्तवने गाईन; [QBR]
10. तूच राजांना तारण देणारा आहे; [QBR] तूच आपला सेवक दावीद याला दुष्टाच्या तलवारीपासून वाचवले. [QBR]
11. मला या परक्यांच्या हातातून मुक्त कर व मला वाचव. [QBR] त्यांचे मुख असत्य बोलते; [QBR] आणि त्यांचा उजवा हात असत्याचा आहे. [QBR]
12. आमची मुले आपल्या तारुण्याच्या भरांत उंच वाढलेल्या रोपांसारखी आहेत. [QBR] आमच्या मुली राजवाड्याच्या कोपऱ्यातील कोरलेल्या खांबाप्रमाणे आहेत. [QBR]
13. आमची कोठारे प्रत्येक प्रकारच्या वस्तुंनी भरलेली असावीत. [QBR] आणि आमच्या शेतात आमची मेंढरे सहस्रपट, दशसहस्रपट वाढावीत. [QBR]
14. मग आमचे बैल लादलेले असावेत; [QBR] दरोडे, धरपकड व आकांत [QBR] हे आमच्या रस्त्यात नसावेत; [QBR]
15. ज्यांना असे आशीर्वाद आहेत ते लोक आशीर्वादित आहेत; [QBR] ज्या लोकांचा देव परमेश्वर आहे ते आनंदी आहेत. [PE]