1. {#1परमेश्वराचे चांगुलपण व सामर्थ्य ह्यांबद्दल स्तुती }[PS]*दाविदाचे स्तोत्र *[PE][QS]माझ्या देवा, हे राजा, मी तुझी खूप स्तुती करीन; [QE][QS]मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचा धन्यवाद करीन. [QE]
2. [QS]प्रत्येक दिवशी मी तुझा धन्यवाद करीन. [QE][QS]मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचे स्तवन करीन. [QE]
3. [QS]परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे; [QE][QS]त्याची महानता अनाकलनीय आहे. [QE]
4. [QS]एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, [QE][QS]आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील. [QE]
5. [QS]ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील, [QE][QS]मी तुझ्या अद्भुत कार्यांचे मनन करीन. [QE]
6. [QS]ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील, [QE][QS]मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन. [QE]
7. [QS]ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील, [QE][QS]आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील. [QE]
8. [QS]परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, [QE][QS]तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे. [QE]
9. [QS]परमेश्वर सर्वांना चांगला आहे; [QE][QS]त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. [QE]
10. [QS]हे परमेश्वरा, तू केलेली सर्व कृत्ये तुला धन्यवाद देतील; [QE][QS]तुझे भक्त तुला धन्यवाद देतील. [QE]
11. [QS]ते तुझ्या राज्याच्या गौरवाविषयी सांगतील, [QE][QS]आणि तुझ्या सामर्थ्याविषयी बोलतील. [QE]
12. [QS]हे यासाठी की, त्यांनी देवाची पराक्रमी कृत्ये [QE][QS]आणि त्याच्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळवावी. [QE]
13. [QS]तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. [QE][QS]आणि तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे. [QE]
14. [QS]पडत असलेल्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, [QE][QS]आणि वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो. [QE]
15. [QS]सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात. [QE][QS]आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस. [QE]
16. [QS]तू आपला हात उघडून [QE][QS]प्रत्येक जिवंत प्राण्याची इच्छा तृप्त करतो. [QE]
17. [QS]परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे; [QE][QS]आणि तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. [QE]
18. [QS]जे कोणी त्याचा धावा करतात, [QE][QS]जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. [QE]
19. [QS]तो त्याचे भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो; [QE][QS]तो त्यांची आरोळी ऐकून त्यांना वाचवतो. [QE]
20. [QS]परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो. [QE][QS]परंतु तो वाईटांचा नाश करतो. [QE]
21. [QS]माझे मुख परमेश्वराची स्तुती करील. [QE][QS]सर्व मानवजात त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद सदासर्वकाळ व कायम करो. [QE]