1. {#1परमेश्वराच्या न्याय्य कृत्यांबद्दल स्तुती } [QS]परमेश्वराची स्तुती करा. [QE][QS]हे माझ्या जिवा, परमेश्वराची स्तुती कर. [QE]
2. [QS]मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन. [QE][QS]मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तवने गाईन. [QE]
3. [QS]अधिपतींवर किंवा ज्याच्याठायी तारण नाही, [QE][QS]अशा त्या मनुष्यजातीवर भरवसा ठेवू नका. [QE]
4. [QS]जेव्हा त्याचा श्वास थांबतो, तो मातीस परत जातो; [QE][QS]त्यादिवशी त्याच्या योजनेचाही शेवट होतो. [QE]
5. [QS]ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे, [QE][QS]ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो आशीर्वादित आहे. [QE]
6. [QS]परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी, [QE][QS]समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, [QE][QS]तो सदासर्वकाळ आपले सत्य पाळतो. [QE]
7. [QS]तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, [QE][QS]आणि तो भुकेल्यांना अन्न देतो. [QE][QS]परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो. [QE]
8. [QS]परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो; [QE][QS]परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. [QE][QS]परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो. [QE]
9. [QS]परमेश्वर आपल्या देशात परक्यांचे रक्षण करतो. [QE][QS]तो पितृहीनांना व विधवा यांना आधार देतो. [QE][QS]परंतु तो वाईटांचा विरोध करतो. [QE]
10. [QS]परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो, [QE][QS]हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. [QE][QS]परमेश्वराची स्तुती करा. [QE]