1. {परमेश्वराच्या न्याय्य कृत्यांबद्दल स्तुती} PS परमेश्वराची स्तुती करा.
हे माझ्या जिवा, परमेश्वराची स्तुती कर. |
2. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन.
मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तवने गाईन. |
6. परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी,
समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, तो सदासर्वकाळ आपले सत्य पाळतो. |
8. परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो;
परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो. |
9. परमेश्वर आपल्या देशात परक्यांचे रक्षण करतो.
तो पितृहीनांना व विधवा यांना आधार देतो. परंतु तो वाईटांचा विरोध करतो. |
10. परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो,
हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराची स्तुती करा. PE |