मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1यरूशलेमेवर केलेल्या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुती } [QS]परमेश्वराची स्तुती करा, [QE][QS]कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे; [QE][QS]ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे. [QE]
2. [QS]परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो; [QE][QS]तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो. [QE]
3. [QS]तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, [QE][QS]आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो. [QE]
4. [QS]तो ताऱ्यांची मोजणी करतो; [QE][QS]तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो. [QE]
5. [QS]आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; [QE][QS]त्याची बुद्धी मोजू शकत नाही. [QE]
6. [QS]परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; [QE][QS]तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो. [QE]
7. [QS]गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा. [QE][QS]वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा. [QE]
8. [QS]तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, [QE][QS]आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, [QE][QS]तो डोंगरावर गवत उगवतो. [QE]
9. [QS]तो प्राण्यांना [QE][QS]आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो. [QE]
10. [QS]घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; [QE][QS]मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही. [QE]
11. [QS]जे परमेश्वराचा आदर करतात, [QE][QS]जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो. [QE]
12. [QS]हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर; [QE][QS]हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर. [QE]
13. [QS]कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; [QE][QS]त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत. [QE]
14. [QS]तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; [QE][QS]तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो. [QE]
15. [QS]तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; [QE][QS]त्याचा शब्द फार वेगाने धावतो. [QE]
16. [QS]तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; [QE][QS]तो राखेसारखे दवाचे कण विखरतो. [QE]
17. [QS]तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; [QE][QS]त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल? [QE]
18. [QS]तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; [QE][QS]तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते. [QE]
19. [QS]त्याने याकोबाला आपले वचन, [QE][QS]इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले. [QE]
20. [QS]त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही; [QE][QS]आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत. [QE][QS]परमेश्वराची स्तुती करा. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 147 / 150
यरूशलेमेवर केलेल्या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुती 1 परमेश्वराची स्तुती करा, कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे; ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे. 2 परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो; तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो. 3 तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो. 4 तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो. 5 आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही. 6 परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो. 7 गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा. वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा. 8 तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, तो डोंगरावर गवत उगवतो. 9 तो प्राण्यांना आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो. 10 घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही. 11 जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो. 12 हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर; हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर. 13 कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत. 14 तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो. 15 तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो. 16 तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; तो राखेसारखे दवाचे कण विखरतो. 17 तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल? 18 तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते. 19 त्याने याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले. 20 त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही; आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा.
Total 150 अध्याय, Selected धडा 147 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References