मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {यरूशलेमेवर केलेल्या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुती} [PS] परमेश्वराची स्तुती करा, [QBR] कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे; [QBR] ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे. [QBR]
2. परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो; [QBR] तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो. [QBR]
3. तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, [QBR] आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो. [QBR]
4. तो ताऱ्यांची मोजणी करतो; [QBR] तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो. [QBR]
5. आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; [QBR] त्याची बुद्धी मोजू शकत नाही. [QBR]
6. परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; [QBR] तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो. [QBR]
7. गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा. [QBR] वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा. [QBR]
8. तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, [QBR] आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, [QBR] तो डोंगरावर गवत उगवतो. [QBR]
9. तो प्राण्यांना [QBR] आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो. [QBR]
10. घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; [QBR] मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही. [QBR]
11. जे परमेश्वराचा आदर करतात, [QBR] जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो. [QBR]
12. हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर; [QBR] हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर. [QBR]
13. कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; [QBR] त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत. [QBR]
14. तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; [QBR] तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो. [QBR]
15. तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; [QBR] त्याचा शब्द फार वेगाने धावतो. [QBR]
16. तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; [QBR] तो राखेसारखे दवाचे कण विखरतो. [QBR]
17. तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; [QBR] त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल? [QBR]
18. तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; [QBR] तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते. [QBR]
19. त्याने याकोबाला आपले वचन, [QBR] इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले. [QBR]
20. त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही; [QBR] आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत. [QBR] परमेश्वराची स्तुती करा. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 अध्याय, Selected धडा 147 / 150
स्तोत्रसंहिता 147:54
यरूशलेमेवर केलेल्या कृपेबद्दल परमेश्वराची स्तुती 1 परमेश्वराची स्तुती करा, कारण आमच्या देवाची स्तुती गाणे चांगले आहे; ते आनंददायक आहे व स्तुती करणे उचित आहे. 2 परमेश्वर यरूशलेम पुन्हा बांधतो; तो इस्राएलाच्या विखुरलेल्या लोकांस एकत्र करतो. 3 तो भग्नहृदयी जनांना बरे करतो, आणि त्यांच्या जखमांस पट्टी बांधतो. 4 तो ताऱ्यांची मोजणी करतो; तो त्यांच्यातील प्रत्येकाला त्यांच्या नावाने हाक मारतो. 5 आमचा प्रभू महान आणि सामर्थ्यात भयचकीत कार्ये करणारा आहे; त्याची बुद्धी मोजू शकत नाही. 6 परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो. 7 गाणे गाऊन परमेश्वराची उपकारस्तुती करा. वीणेवर आमच्या देवाचे स्तुतीगान करा. 8 तो ढगांनी आकाश झाकून टाकतो, आणि पृथ्वीसाठी पाऊस तयार करतो, तो डोंगरावर गवत उगवतो. 9 तो प्राण्यांना आणि जेव्हा कावळ्यांची पिल्ले कावकाव करतात त्यांना अन्न देतो. 10 घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही. 11 जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो. 12 हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर; हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर. 13 कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत. 14 तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो. 15 तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो. 16 तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; तो राखेसारखे दवाचे कण विखरतो. 17 तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल? 18 तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते. 19 त्याने याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले. 20 त्याने हे दुसऱ्या कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही; आणि त्यांनी त्याचे निर्णय जाणले नाहीत. परमेश्वराची स्तुती करा.
Total 150 अध्याय, Selected धडा 147 / 150
Common Bible Languages
West Indian Languages
×

Alert

×

marathi Letters Keypad References