1. {देवाची कृत्ये आणि त्याचे नियम} PS आकाश देवाचा गौरव जाहीर करते,
आणि अंतराळ त्याच्या हातचे कृत्य दाखविते. |
4. तरी त्यांचे शब्द सर्व पृथ्वीभर जातात.
आणि त्यांचे बोलणे जगाच्या शेवटापर्यंत जाते. त्याने सुर्यासाठी आकाशामध्ये मंडप उभारला आहे. |
5. सूर्य नवऱ्या मुलासारखा आपल्या मांडवातून बाहेर येतो.
आणि सामर्थ्यवान पुरुषाप्रमाणे तो आपली धाव धावण्यात आनंद करतो. |
6. सूर्य एक क्षितीजापासून उदय होतो,
आणि दुसऱ्या क्षितिजापर्यंत आकाशात पार जातो. त्याच्या उष्णतेपासून कोणाचीही सुटका होत नाही. |
7. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते जीवाला पुर्नजीवित करणारे आहे.
परमेश्वराचे नियम विश्वसनीय आहेत, ज्यांना अनुभव नाही त्यांना शहाणपण देणारे आहे. |
8. परमेश्वराच्या सूचना खऱ्या आहेत. जे हृदयाला हर्षीत करतात.
परमेश्वराच्या कराराचे नियम शुद्ध आहेत, ते डोळे प्रकाशवनारे आहेत. |
9. परमेश्वराची भीती शुद्ध आहे, ती सर्वकाळ टिकणारे आहे,
परमेश्वराचे नियम खरे आहेत, आणि सर्व न्यायी आहेत. |
10. ते सोन्यापेक्षा ही मौल्यवान आहेत. अती उत्तम सोन्यापेक्षाही ते शुद्ध आहेत.
ते मधाच्या पोळ्यातून गळणाऱ्या, मधापेक्षाही गोड आहेत. |
13. तुझ्या सेवकाला जाणूनबुजून केलेल्या पापापासून राख;
ती माझ्यावर राज्य न गाजवोत. तेव्हा मी परिपूर्ण होईल, आणि माझ्या पुष्कळ अपराधांपासून निर्दोष राहीन. |
14. माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या हृदयाचे विचार तुझ्यासमोर मान्य असोत.
परमेश्वरा, तू माझा खडक आहेस, मला तारणारा तूच आहेस. PE |