1. {#1परमेश्वराच्या अभिषिक्ताचे राज्य } [PS]राष्ट्रे का बंडखोर झाली आहेत, [PE][QS]आणि लोक व्यर्थच का कट रचत आहेत? [QE]
2. [QS]पृथ्वीचे राजे परमेश्वराविरूद्ध व त्याच्या अभिषिक्त्याविरूद्ध एकत्र उभे झाले आहेत, [QE][QS]आणि राज्यकर्ते एकत्र मिळून कट रचत आहेत, ते म्हणतात. [QE]
3. [QS]चला, आपण त्यांच्या बेड्या तोडून टाकू, जे त्यांनी आपणावर लादल्या होत्या. [QE][QS]आणि त्यांचे साखळदंड फेकून देऊ. [QE]
4. [QS]परंतु तो जो आकाशांत बसलेला आहे तो हसेल, [QE][QS]प्रभू त्यांचा उपहास करेल. [QE]
5. [QS]तेव्हा तो आपल्या रागात त्यांच्याशी बोलेल, [QE][QS]आणि आपल्या संतापाने त्यांना घाबरे करील. [QE]
6. [QS]मी माझ्या पवित्र डोंगरावर, सीयोनावर[* हे नाव मारिया डोंगरावरील एका टेकडीला देण्यात आले होते ज्यावर शलमोन राजाने मंदिर बांधले ], [QE][QS]माझ्या राजास अभिषेक केला आहे. [QE]
7. [QS]मी परमेश्वराचा फर्मान घोषीत करीन, [QE][QS]तो मला म्हणाला, “तू माझा पुत्र आहेस.” [QE][QS]या दिवशी मी तुझा पिता झालो आहे. [QE]
8. [QS]मला माग, आणि मी तुला राष्ट्रे तुझे वतन आणि पृथ्वीच्या सीमा तुझ्या ताब्यात देईल. [QE]
9. [QS]लोखंडी दंडाने तू त्यांना तोडशील, [QE][QS]कुंभाराच्या भांड्यासारखा तू त्यांना फोडशील. [QE]
10. [QS]म्हणून आता, अहो राजांनो, सावध व्हा; [QE][QS]पृथ्वीच्या राज्यकर्त्यांनो, चूक दुरुस्त करा. [QE]
11. [QS]भय धरून परमेश्वराची स्तुती करा [QE][QS]आणि थरथर कापून हर्ष करा. [QE]
12. [QS]आणि तो तुमच्यावर रागावू नये, [QE][QS]ह्यासाठी देवाच्या पुत्रास खरी निष्ठा द्या, म्हणजे तुम्ही मरणार नाही. [QE][QS]कारण देवाचा क्रोध त्वरीत पेटेल. [QE][QS]जे सर्व त्याच्याठायी आश्रय घेतात ते आशीर्वादीत आहेत. [QE]