1. {दुःखाची आरोळी आणि स्तुतीगीत} PS माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास?
मला तारायला आणि माझ्या वेदनांचा शब्द ऐकायला तू दूर का आहेस? |
4. आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. होय देवा,
त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस. |
5. देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी आरोळी केली आणि त्यांना तू सोडवले,
त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांची निराशा झाली नाही. |
8. ते म्हणतात “तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो,
तर परमेश्वर त्यास सोडवो. त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.” |
9. परंतु मला उदरांतून बाहेर काढणारा तुच आहेस,
मी माझ्या आईच्या स्तनांवर असता, तू मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवले. |
13. जसा सिंह आपले तोंड त्याच्या भक्ष्यास फाडण्यास उघडतो,
तसे त्यांनी आपले तोंड माझ्या विरूद्ध उघडले आहे. |
14. मी पाण्यासारखा ओतला जात आहे,
आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत. माझे हृदय मेणासारखे झाले आहे. जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे. |
15. फुटलेल्या खापराप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली आहे.
माझी जीभ टाळूला चिकटली आहे. तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहे. |
16. “कुत्री” मला वेढून आहेत,
मला दुष्टांच्या घोळक्यांनी घेरले आहे. त्यांनी माझ्या हातापायाला छेदले आहे. |
20. परमेश्वरा माझे आयुष्य तलवारीपासून वाचव,
माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांच्या पंज्यापासून वाचव. |
23. जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा!
याकोबाच्या सर्व वंशजांनो, त्यास मान द्या! इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा. |
24. कारण परमेश्वराने संकटात सापडलेल्यांच्या दु:खाला तुच्छ मानले नाही आणि किळस केला नाही.
आणि त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून लपवले नाही. जेव्हा पिडीतांनी त्यास आरोळी केली, त्याने ऐकले. |
26. गरीब लोक खातील आणि समाधानी राहतील.
जे लोक परमेश्वरास शोधत आहेत, ते त्याची स्तुती करतील. तुझे हृदय सर्वकाळ जिवंत राहो. |
27. सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील.
सर्व राष्ट्रातील कुटूंब तुला नमन करतील. |
29. पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील.
जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत, ते त्यास नमन करतील. |
31. ते येतील आणि जे जन्मतील त्यांना ते त्याचे न्यायीपण प्रगट करतील, ते म्हणतील त्यानेच हे केले आहे. PE
|