1. {#1दुःखाची आरोळी आणि स्तुतीगीत }[PS]*प्रमुख गायकासाठी अय्येलेथ हाश्शहर (म्हणजे पहाटेची हरिणी) या रागावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? [QE][QS]मला तारायला आणि माझ्या वेदनांचा शब्द ऐकायला तू दूर का आहेस? [QE]
2. [QS]माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस, [QE][QS]आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही. [QE]
3. [QS]तरी तू पवित्र आहेस, [QE][QS]जो इस्राएलाच्या स्तवनामध्ये वसतोस. [QE]
4. [QS]आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. होय देवा, [QE][QS]त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस. [QE]
5. [QS]देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी आरोळी केली आणि त्यांना तू सोडवले, [QE][QS]त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांची निराशा झाली नाही. [QE]
6. [QS]परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही, [QE][QS]जो मनुष्यांनी निंदिलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे. [QE]
7. [QS]सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात; [QE][QS]ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात. [QE]
8. [QS]ते म्हणतात “तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, [QE][QS]तर परमेश्वर त्यास सोडवो. [QE][QS]त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.” [QE]
9. [QS]परंतु मला उदरांतून बाहेर काढणारा तुच आहेस, [QE][QS]मी माझ्या आईच्या स्तनांवर असता, तू मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवले. [QE]
10. [QS]मी गर्भातूनच तुझ्यावर सोपवून दिलेला होतो. [QE][QS]माझ्या आईच्या उदरात असतानाच तू माझा देव आहेस. [QE]
11. [QS]माझ्यापासून दूर नको राहू, कारण संकट जवळच आहे. [QE][QS]आणि मला मदत करायला कोणीही नाही. [QE]
12. [QS]खुप बैलांनी मला वेढले आहे, [QE][QS]बाशानाच्या बळकट बैलांनी मला वेढले आहे. [QE]
13. [QS]जसा सिंह आपले तोंड त्याच्या भक्ष्यास फाडण्यास उघडतो, [QE][QS]तसे त्यांनी आपले तोंड माझ्या विरूद्ध उघडले आहे. [QE]
14. [QS]मी पाण्यासारखा ओतला जात आहे, [QE][QS]आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत. [QE][QS]माझे हृदय मेणासारखे झाले आहे. [QE][QS]जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे. [QE]
15. [QS]फुटलेल्या खापराप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली आहे. [QE][QS]माझी जीभ टाळूला चिकटली आहे. [QE][QS]तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहे. [QE]
16. [QS]“कुत्री” मला वेढून आहेत, [QE][QS]मला दुष्टांच्या घोळक्यांनी घेरले आहे. [QE][QS]त्यांनी माझ्या हातापायाला छेदले आहे. [QE]
17. [QS]मी माझी सर्व हाडे मोजू शकतो. [QE][QS]ते माझ्याकडे टक लावून बघतात. [QE]
18. [QS]त्यांनी माझे कपडे त्यांच्यात वाटून घेतली आहेत, [QE][QS]आणि माझ्या कपड्यांसाठी ते चिठ्या टाकतात. [QE]
19. [QS]परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तुच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर. [QE]
20. [QS]परमेश्वरा माझे आयुष्य तलवारीपासून वाचव, [QE][QS]माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांच्या पंज्यापासून वाचव. [QE]
21. [QS]सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. [QE][QS]जंगली बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर. [QE]
22. [QS]परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझे नाव सांगेन. [QE][QS]सभेत मी तुझे गुणगान गाईन. [QE]
23. [QS]जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा! [QE][QS]याकोबाच्या सर्व वंशजांनो, त्यास मान द्या! [QE][QS]इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा. [QE]
24. [QS]कारण परमेश्वराने संकटात सापडलेल्यांच्या दु:खाला तुच्छ मानले नाही आणि किळस केला नाही. [QE][QS]आणि त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून लपवले नाही. [QE][QS]जेव्हा पिडीतांनी त्यास आरोळी केली, त्याने ऐकले. [QE]
25. [QS]परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करीन. [QE][QS]तुझे भय धरणाऱ्यांपुढे मी आपले नवस फेडीन. [QE]
26. [QS]गरीब लोक खातील आणि समाधानी राहतील. [QE][QS]जे लोक परमेश्वरास शोधत आहेत, ते त्याची स्तुती करतील. [QE][QS]तुझे हृदय सर्वकाळ जिवंत राहो. [QE]
27. [QS]सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील. [QE][QS]सर्व राष्ट्रातील कुटूंब तुला नमन करतील. [QE]
28. [QS]कारण राज्य परमेश्वरचे आहे, [QE][QS]तो जगावर अधिकार करणारा आहे. [QE]
29. [QS]पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील. [QE][QS]जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत, [QE][QS]ते त्यास नमन करतील. [QE]
30. [QS]येणारी पिढी त्याची सेवा करणार. [QE][QS]ते त्यांच्या पुढच्या पिढीला प्रभूबद्दल सांगतील. [QE]
31. [QS]ते येतील आणि जे जन्मतील त्यांना ते त्याचे न्यायीपण प्रगट करतील, ते म्हणतील त्यानेच हे केले आहे. [QE]