1. {दुःखाची आरोळी आणि स्तुतीगीत} [PS] माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? [QBR] मला तारायला आणि माझ्या वेदनांचा शब्द ऐकायला तू दूर का आहेस? [QBR]
2. माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस, [QBR] आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही. [QBR]
3. तरी तू पवित्र आहेस, [QBR] जो इस्राएलाच्या स्तवनामध्ये वसतोस. [QBR]
4. आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. होय देवा, [QBR] त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस. [QBR]
5. देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी आरोळी केली आणि त्यांना तू सोडवले, [QBR] त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांची निराशा झाली नाही. [QBR]
6. परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही, [QBR] जो मनुष्यांनी निंदिलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे. [QBR]
7. सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात; [QBR] ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात. [QBR]
8. ते म्हणतात “तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, [QBR] तर परमेश्वर त्यास सोडवो. [QBR] त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.” [QBR]
9. परंतु मला उदरांतून बाहेर काढणारा तुच आहेस, [QBR] मी माझ्या आईच्या स्तनांवर असता, तू मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवले. [QBR]
10. मी गर्भातूनच तुझ्यावर सोपवून दिलेला होतो. [QBR] माझ्या आईच्या उदरात असतानाच तू माझा देव आहेस. [QBR]
11. माझ्यापासून दूर नको राहू, कारण संकट जवळच आहे. [QBR] आणि मला मदत करायला कोणीही नाही. [QBR]
12. खुप बैलांनी मला वेढले आहे, [QBR] बाशानाच्या बळकट बैलांनी मला वेढले आहे. [QBR]
13. जसा सिंह आपले तोंड त्याच्या भक्ष्यास फाडण्यास उघडतो, [QBR] तसे त्यांनी आपले तोंड माझ्या विरूद्ध उघडले आहे. [QBR]
14. मी पाण्यासारखा ओतला जात आहे, [QBR] आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत. [QBR] माझे हृदय मेणासारखे झाले आहे. [QBR] जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे. [QBR]
15. फुटलेल्या खापराप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली आहे. [QBR] माझी जीभ टाळूला चिकटली आहे. [QBR] तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहे. [QBR]
16. “कुत्री” मला वेढून आहेत, [QBR] मला दुष्टांच्या घोळक्यांनी घेरले आहे. [QBR] त्यांनी माझ्या हातापायाला छेदले आहे. [QBR]
17. मी माझी सर्व हाडे मोजू शकतो. [QBR] ते माझ्याकडे टक लावून बघतात. [QBR]
18. त्यांनी माझे कपडे त्यांच्यात वाटून घेतली आहेत, [QBR] आणि माझ्या कपड्यांसाठी ते चिठ्या टाकतात. [QBR]
19. परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तुच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर. [QBR]
20. परमेश्वरा माझे आयुष्य तलवारीपासून वाचव, [QBR] माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांच्या पंज्यापासून वाचव. [QBR]
21. सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. [QBR] जंगली बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर. [QBR]
22. परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझे नाव सांगेन. [QBR] सभेत मी तुझे गुणगान गाईन. [QBR]
23. जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा! [QBR] याकोबाच्या सर्व वंशजांनो, त्यास मान द्या! [QBR] इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा. [QBR]
24. कारण परमेश्वराने संकटात सापडलेल्यांच्या दु:खाला तुच्छ मानले नाही आणि किळस केला नाही. [QBR] आणि त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून लपवले नाही. [QBR] जेव्हा पिडीतांनी त्यास आरोळी केली, त्याने ऐकले. [QBR]
25. परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करीन. [QBR] तुझे भय धरणाऱ्यांपुढे मी आपले नवस फेडीन. [QBR]
26. गरीब लोक खातील आणि समाधानी राहतील. [QBR] जे लोक परमेश्वरास शोधत आहेत, ते त्याची स्तुती करतील. [QBR] तुझे हृदय सर्वकाळ जिवंत राहो. [QBR]
27. सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील. [QBR] सर्व राष्ट्रातील कुटूंब तुला नमन करतील. [QBR]
28. कारण राज्य परमेश्वरचे आहे, [QBR] तो जगावर अधिकार करणारा आहे. [QBR]
29. पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील. [QBR] जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत, [QBR] ते त्यास नमन करतील. [QBR]
30. येणारी पिढी त्याची सेवा करणार. [QBR] ते त्यांच्या पुढच्या पिढीला प्रभूबद्दल सांगतील. [QBR]
31. ते येतील आणि जे जन्मतील त्यांना ते त्याचे न्यायीपण प्रगट करतील, ते म्हणतील त्यानेच हे केले आहे. [PE]