1. {गौरवाचा राजा} [PS] भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. [QBR] जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत. [QBR]
2. कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला, [QBR] आणि जलांवर त्याने ती स्थापली. [QBR]
3. परमेश्वराच्या [* सियोन पर्वत ] डोंगरावर कोण चढेल? [QBR] परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू [† आराधना करू ] शकतो? [QBR]
4. ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, [QBR] ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, [QBR] आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही. [QBR]
5. तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल, [QBR] आणि त्यालाच त्याच्या तारणाऱ्या देवापासून न्यायीपण मिळेल. [QBR]
6. हिच पिढी त्यास शोधणारी आहे, [QBR] जी याकोबाच्या देवाचे मुख शोधते. [QBR]
7. अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा. [QBR] पुर्वकालीन द्वारांनो, उंच व्हा, [QBR] म्हणजे गौरवशाली राजा आत येईल. [QBR]
8. गौरवशाली राजा कोण आहे? [QBR] तोच परमेश्वर, सामर्थ्यशाली आणि थोर आहे. [QBR]
9. वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. [QBR] सर्वकाळच्या दरवाजांनो, तुम्ही उंच व्हा, [QBR] म्हणजे गौरवशाली राजा आत येईल. [QBR]
10. तो गौरवशाली राजा कोण आहे? [QBR] सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे, [QBR] तोच तो गौरवशाली राजा आहे. [PE]