1. {#1गौरवाचा राजा }[PS]*दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]भूमी आणि तिच्यावरील परिपूर्णता परमेश्वराची आहे. [QE][QS]जग आणि त्यातील सर्व राहणारे परमेश्वराचे आहेत. [QE]
2. [QS]कारण त्याने समुद्रावर तिचा पाया घातला, [QE][QS]आणि जलांवर त्याने ती स्थापली. [QE]
3. [QS]परमेश्वराच्या [* सियोन पर्वत ]डोंगरावर कोण चढेल? [QE][QS]परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू [† आराधना करू ] शकतो? [QE]
4. [QS]ज्याचे हात निर्मळ आहेत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, [QE][QS]ज्याने आपला जीव खोटेपणाकडे उंचावला नाही, [QE][QS]आणि ज्याने दुष्टपणाने शपथ वाहिली नाही. [QE]
5. [QS]तो परमेश्वराकडून आशीर्वाद प्राप्त करेल, [QE][QS]आणि त्यालाच त्याच्या तारणाऱ्या देवापासून न्यायीपण मिळेल. [QE]
6. [QS]हिच पिढी त्यास शोधणारी आहे, [QE][QS]जी याकोबाच्या देवाचे मुख शोधते. [QE]
7. [QS]अहो! वेशींनो, आपले मस्तक उंच करा. [QE][QS]पुर्वकालीन द्वारांनो, उंच व्हा, [QE][QS]म्हणजे गौरवशाली राजा आत येईल. [QE]
8. [QS]गौरवशाली राजा कोण आहे? [QE][QS]तोच परमेश्वर, सामर्थ्यशाली आणि थोर आहे. [QE]
9. [QS]वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. [QE][QS]सर्वकाळच्या दरवाजांनो, तुम्ही उंच व्हा, [QE][QS]म्हणजे गौरवशाली राजा आत येईल. [QE]
10. [QS]तो गौरवशाली राजा कोण आहे? [QE][QS]सेनाधीश परमेश्वरच तो राजा आहे, [QE][QS]तोच तो गौरवशाली राजा आहे. [QE]