1. {सात्त्विकतेचा दावा} [PS] हे परमेश्वरा, माझा न्याय कर. कारण मी प्रामाणिकपणाने चाललो आहे. [QBR] मी परमेश्वरावर न डगमगता विश्वास ठेवला आहे. [QBR]
2. हे परमेश्वरा, मला पारख आणि माझे परिक्षण कर. [QBR] माझ्ये हृदय आणि आतील मन निरखून पाहा. [QBR]
3. कारण तुझी प्रेमदया सदैव माझ्या डोळ्यांपुढे आहे, [QBR] आणि मी तुझ्या सत्यात चाललो आहे. [QBR]
4. कपटी लोकांबरोबर मी सहयोगी झालो नाही, [QBR] किंवा मी अप्रामाणिक लोकांत मिसळलो नाही. [QBR]
5. मी त्या दुष्टांच्या सभेचा तिरस्कार करतो. [QBR] आणि मी दुष्टांसोबत राहत नाही. [QBR]
6. मी आपले हात निर्दोषतेने धुईन, [QBR] आणि परमेश्वरा मी तुझ्या वेदीकडे वळीन. [QBR]
7. अशासाठी की, मी तुझी स्तुती मोठ्याने करावी [QBR] आणि तू केलेल्या आश्चर्याची कृत्ये सांगावी. [QBR]
8. परमेश्वरा, तुझे राहण्याचे घर आणि [QBR] तुझे गौरव जिथे असते, ते घर मला आवडते. [QBR]
9. पाप्यांसोबत किंवा रक्तपात करणाऱ्यांसोबत माझा प्राण काढून घेऊ नकोस. [QBR]
10. त्यांच्या हातात कट आहे, [QBR] आणि त्यांचा उजवा हात लाच घेण्याने भरला आहे. [QBR]
11. पण मी तर प्रामाणिकपणाने वागेन, [QBR] माझ्यावर दया कर आणि मला तार. [QBR]
12. माझा पाय सपाट ठिकाणी उभा आहे, [QBR] सभेमध्ये मी परमेश्वराची स्तुती करीन. [PE]