1. {परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे} [PS] परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे. [QBR] मी कोणाचे भय बाळगू? [QBR] परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे, [QBR] मी कोणाची भीती बाळगू? [QBR]
2. जेव्हा दुष्ट माझे मांस खायला जवळ आले, [QBR] तेव्हा माझे शत्रू आणि माझे विरोधक अडखळून खाली पडले. [QBR]
3. जरी सैन्याने माझ्याविरोधात तळ दिला, [QBR] माझे हृदय भयभीत होणार नाही. [QBR] जरी माझ्याविरूद्ध युध्द उठले, [QBR] तरी सुद्धा मी निर्धास्त राहीन. [QBR]
4. मी परमेश्वरास एक गोष्ट मागितली, तीच मी शोधीन, [QBR] परमेश्वराची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात [QBR] ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस घालवेन, [QBR] परमेश्वराच्या घरात मी वस्ती करीन. [QBR]
5. कारण माझ्या संकट समयी तो माझे लपण्याचे ठिकाण आहे; [QBR] तो मला त्याच्या तंबूत लपवेल, [QBR] तो मला खडकावर उंच करील. [QBR]
6. तेव्हा माझ्या सभोवती असणाऱ्या शत्रू समोर माझे मस्तक उंचावले जाईल, [QBR] आणि त्याच्या मंडपात मी सदैव आनंदाचा यज्ञ अर्पण करणार, [QBR] मी गाईन, होय! परमेश्वरास मी स्तुती गाईन. [QBR]
7. परमेश्वरा, मी तुला आरोळी करेन तेव्हा माझा आवाज ऐक! [QBR] माझ्यावर दया कर आणि मला उत्तर दे. [QBR]
8. माझे हृदय तुझ्या विषयी म्हणाले, [QBR] त्याचे मुख शोध, हे परमेश्वरा, मी तुझे मुख शोधीन. [QBR]
9. तू आपले मुख माझ्यापासून लपवू नकोस; [QBR] तुझ्या सेवकाला रागात फटकारू नकोस! [QBR] तू माझा सहाय्यकर्ता होत आला आहेस; [QBR] माझ्या तारण करणाऱ्या देवा, मला सोडू किंवा त्यागू नकोस. [QBR]
10. जरी माझ्या आईवडीलांनी मला सोडून दिले तरी, [QBR] परमेश्वर मला उचलून घेईल. [QBR]
11. परमेश्वरा, तू मला तुझे मार्ग शिकव. [QBR] माझ्या वैऱ्यामुळे, [QBR] मला सपाट मार्गावर चालव. [QBR]
12. माझा जीव शत्रूस देऊ नको, [QBR] कारण खोटे साक्षी माझ्याविरूद्ध उठले आहेत, [QBR] आणि ते हिंसक श्वास टाकतात. [QBR]
13. जीवंताच्या भूमीत, जर परमेश्वराचा चांगुलपणा पाहायला मी विश्वास केला नसता, [QBR] तर मी कधीच माझी आशा सोडून दिली असती. [QBR]
14. परमेश्वराची वाट पाहा; [QBR] मजबूत हो आणि तुझे हृदय धैर्यवान असो. [QBR] परमेश्वराची वाट पाहा. [PE]