1. {तुफानात परमेश्वराची वाणी} [PS] स्वर्गदूतहो, परमेश्वरास गौरव [QBR] आणि सामर्थ्य आहे असे कबूल करा. [QBR]
2. परमेश्वरास त्याच्या वैभवी नावाचे श्रेय द्या; [QBR] पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. [QBR]
3. परमेश्वराचा आवाज जलांवरून ऐकण्यात आला, [QBR] गौरवशाली देव गर्जत आहे, [QBR] परमेश्वर पुष्कळ जलांवर गर्जत आहे. [QBR]
4. परमेश्वराचा आवाज सामर्थशाली आहे, [QBR] परमेश्वराचा आवाज चमत्कारीक आहे. [QBR]
5. परमेश्वराची वाणी देवदार वृक्षाला तोडते, [QBR] परमेश्वर लबानोनाच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो. [QBR]
6. तो लबानोनला वासराप्रमाणे आणि [QBR] सिर्योनला तरुण बैलाप्रमाणे बागडायला लावतो. [QBR]
7. परमेश्वराची वाणी अग्नी ज्वालासह हल्ला करते. [QBR]
8. परमेश्वराची वाणी वाळवंटाला कंपित करते [QBR] कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या वाणीने हादरते. [QBR]
9. परमेश्वराची वाणी हरणाला प्रसवयास लावते [QBR] आणि अरण्य पर्णहीन करते. [QBR] पण त्याच्या मंदिरात सर्व “महिमा!” गातात [QBR]
10. महापुरावर परमेश्वर राजा बसला आहे, [QBR] आणि परमेश्वरच सर्वकाळचा राजा म्हणून बसला आहे. [QBR]
11. परमेश्वर त्याच्या लोकांना सामर्थ्य देतो, [QBR] परमेश्वर त्याच्या लोकांना शांतीने आशीर्वादित करतो. [PE]