1. {#1मृत्यूपासून झालेल्या बचावाबद्दल उपकारस्तुती }[PS]*स्तोत्र; मंदिराच्या प्रतिस्थापनेच्या वेळचे गाणे. दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]हे परमेश्वरा, मी तुला उंच करीन, कारण तू मला उठून उभे केले आहेस आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष करू दिला नाहीस. [QE]
2. [QS]हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले. [QE]
3. [QS]हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे. [QE]
4. [QS]जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या. [QE]
5. [QS]कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे. [QE][QS]रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच. [QE]
6. [QS]मी आत्मविश्वासात म्हणालो, मी कधीही ढळणार नाही. [QE]
7. [QS]होय, परमेश्वरा तुझ्या अनुग्रहाने मला बळकट पर्वतासारखे स्थापले आहे. परंतु जेव्हा तू आपले मुख लपवतोस तेव्हा मी भयभीत होतो. [QE]
8. [QS]परमेश्वरा, मी तुझ्याकडे आरोळी केली आणि माझ्या प्रभू कडून अनुग्रह मागितला. [QE]
9. [QS]मी मरण पावल्यावर खाली थडग्यात गेलो तर काय लाभ? [QE][QS]माती तुझी स्तुती करणार काय? ती तुझी विश्वासयोग्यता सांगेल काय? [QE]
10. [QS]हे परमेश्वरा, ऐक आणि माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला मदत करणारा हो. [QE]
11. [QS]तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत. [QE]
12. [QS]म्हणून माझे हृदय तुझी स्तुती गाईल आणि शांत राहणार नाही. हे परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सर्वकाळ स्तुती करीन. [QE]