मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {मृत्यूपासून झालेल्या बचावाबद्दल उपकारस्तुती} [PS] हे परमेश्वरा, मी तुला उंच करीन, कारण तू मला उठून उभे केले आहेस आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष करू दिला नाहीस. [QBR]
2. हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले. [QBR]
3. हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे. [QBR]
4. जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या. [QBR]
5. कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे. [QBR] रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच. [QBR]
6. मी आत्मविश्वासात म्हणालो, मी कधीही ढळणार नाही. [QBR]
7. होय, परमेश्वरा तुझ्या अनुग्रहाने मला बळकट पर्वतासारखे स्थापले आहे. परंतु जेव्हा तू आपले मुख लपवतोस तेव्हा मी भयभीत होतो. [QBR]
8. परमेश्वरा, मी तुझ्याकडे आरोळी केली आणि माझ्या प्रभू कडून अनुग्रह मागितला. [QBR]
9. मी मरण पावल्यावर खाली थडग्यात गेलो तर काय लाभ? [QBR] माती तुझी स्तुती करणार काय? ती तुझी विश्वासयोग्यता सांगेल काय? [QBR]
10. हे परमेश्वरा, ऐक आणि माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला मदत करणारा हो. [QBR]
11. तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत. [QBR]
12. म्हणून माझे हृदय तुझी स्तुती गाईल आणि शांत राहणार नाही. हे परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सर्वकाळ स्तुती करीन. [PE]

Notes

No Verse Added

Total 150 Chapters, Current Chapter 30 of Total Chapters 150
स्तोत्रसंहिता 30:31
1. {मृत्यूपासून झालेल्या बचावाबद्दल उपकारस्तुती} PS हे परमेश्वरा, मी तुला उंच करीन, कारण तू मला उठून उभे केले आहेस आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष करू दिला नाहीस.
2. हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले.
3. हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे.
4. जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
5. कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे.
रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.
6. मी आत्मविश्वासात म्हणालो, मी कधीही ढळणार नाही.
7. होय, परमेश्वरा तुझ्या अनुग्रहाने मला बळकट पर्वतासारखे स्थापले आहे. परंतु जेव्हा तू आपले मुख लपवतोस तेव्हा मी भयभीत होतो.
8. परमेश्वरा, मी तुझ्याकडे आरोळी केली आणि माझ्या प्रभू कडून अनुग्रह मागितला.
9. मी मरण पावल्यावर खाली थडग्यात गेलो तर काय लाभ?
माती तुझी स्तुती करणार काय? ती तुझी विश्वासयोग्यता सांगेल काय?
10. हे परमेश्वरा, ऐक आणि माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला मदत करणारा हो.
11. तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत.
12. म्हणून माझे हृदय तुझी स्तुती गाईल आणि शांत राहणार नाही. हे परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सर्वकाळ स्तुती करीन. PE
Total 150 Chapters, Current Chapter 30 of Total Chapters 150
×

Alert

×

marathi Letters Keypad References