1. {श्रद्धेसंबंधी साक्ष} PS हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे,
कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस. तुझ्या न्यायात मला वाचव. |
8. तू मला माझ्या शत्रूंच्या हाती सोपवून दिले नाहीस.
तू माझा पाय खुल्या विस्तीर्ण जागेत स्थिर केला आहे. |
9. परमेश्वरा, माझ्यावर दया कर, कारण मी दु:खात आहे.
माझे डोळे, माझा जीव, माझ्या देहासह क्षीण झाला आहे. |
10. कारण माझे आयुष्य दु:खात
आणि कण्हण्यात माझी वर्षे गेली आहेत. माझ्या पापांमुळे माझी शक्ती क्षीण झाली आहेत, आणि माझी हाडे झिजली आहेत. |
11. माझ्या शत्रूंमुळे लोक माझा तिरस्कार करतात
माझ्या शेजाऱ्यास माझी परिस्थिती भयावह आहे, आणि जे मला ओखळतात त्यांना मी भय असा झालो आहे. |
12. मृत पावलेल्या मनुष्यासारखा मी झालो आहे, ज्याची कोणी आठवण करत नाही.
मी फुटलेल्या भांड्यासारखा झालो आहे. |
13. कारण पुष्कळांनी केलीली निंदा मी ऐकली आहे,
प्रत्येक बाजूनी भयावह बातमी आहे, ते माझ्याविरुध्द कट करत आहेत. |
15. माझे वेळ तुझ्या हातात आहे.
मला माझ्या शत्रूंच्या आणि जे माझा पाठलाग करतात त्यांच्या हातातून सोडव. |
17. परमेश्वरा, मला निराश होऊ देऊ नकोस, कारण मी तुला हाक मारतो,
दुष्ट निराश केला जावो, मृतलोकांत तो निःशब्द होवो. |
18. खोटे बोलणारे ओठ शांत केले जावोत,
जसे ते नितीमानांच्याविरूद्ध असत्य आणि तिरस्काराने उद्धटपणे बोलतात. |
19. जे तुझा आदर बाळगतात त्यांच्यासाठी तू आपला थोर चांगूलपणा जपून ठेवला आहे,
जे तुझ्यामध्ये आश्रय घेतात त्यांच्याकरिता तू सर्व मानवजाती समोर घडवून आणतोस. |
20. त्यांना आपल्या उपस्थितीच्या आश्रयात तू मनुष्याच्या कटापासून लपवशील.
हिंसक जीभेपासून तू त्यांना मंडपात लपवशील. |
22. मी घाईत म्हणालो,
मी तुझ्या नजरेसमोरून छेदून टाकलो आहे, तरी तू माझी मदतीची विनंती ऐकली, जेव्हा मी तुझ्याकडे आरोळी केली. |
23. अहो सर्व परमेश्वराच्या मागे चालणाऱ्यांनो, त्याच्यावर प्रीती करा.
कारण परमेश्वर विश्वासू लोकांचे रक्षण करतो. परंतु तो गर्विष्ठ्यांची परत फेड करतो. |