1. {श्रद्धेसंबंधी साक्ष} [PS] हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे, [QBR] कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस. [QBR] तुझ्या न्यायात मला वाचव. [QBR]
2. माझे ऐक, त्वरीत मला वाचव, [QBR] माझ्या आश्रयाचा खडक हो. [QBR] माझा तारणारा बळकट दुर्ग असा हो. [QBR]
3. कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस, [QBR] तर तुझ्या नामास्तव मला मार्गदर्शन कर आणि मला चालव. [QBR]
4. त्यांनी गुप्तपणे रचलेल्या सापळ्यातून तू मला उपटून बाहेर काढ. [QBR] कारण तू माझा आश्रय आहे. [QBR]
5. मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, [QBR] हे परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला खंडून घेतले आहे. [QBR]
6. जे निरुपयोगी मूर्तींची सेवा करतात, त्यांचा मी तिरस्कार करतो. [QBR] परंतु मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो. [QBR]
7. तुझ्या प्रेमदयेमध्ये मी आनंद आणि हर्ष करीन, [QBR] कारण तू माझे दु:ख पाहिले आहेस. [QBR]
8. तू मला माझ्या शत्रूंच्या हाती सोपवून दिले नाहीस. [QBR] तू माझा पाय खुल्या विस्तीर्ण जागेत स्थिर केला आहे. [QBR]
9. परमेश्वरा, माझ्यावर दया कर, कारण मी दु:खात आहे. [QBR] माझे डोळे, माझा जीव, माझ्या देहासह क्षीण झाला आहे. [QBR]
10. कारण माझे आयुष्य दु:खात [QBR] आणि कण्हण्यात माझी वर्षे गेली आहेत. [QBR] माझ्या पापांमुळे माझी शक्ती क्षीण झाली आहेत, [QBR] आणि माझी हाडे झिजली आहेत. [QBR]
11. माझ्या शत्रूंमुळे लोक माझा तिरस्कार करतात [QBR] माझ्या शेजाऱ्यास माझी परिस्थिती भयावह आहे, [QBR] आणि जे मला ओखळतात त्यांना मी भय असा झालो आहे. [QBR]
12. मृत पावलेल्या मनुष्यासारखा मी झालो आहे, ज्याची कोणी आठवण करत नाही. [QBR] मी फुटलेल्या भांड्यासारखा झालो आहे. [QBR]
13. कारण पुष्कळांनी केलीली निंदा मी ऐकली आहे, [QBR] प्रत्येक बाजूनी भयावह बातमी आहे, [QBR] ते माझ्याविरुध्द कट करत आहेत. [QBR]
14. परंतु परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. [QBR] तूच माझा देव आहेस, असे मी म्हणतो. [QBR]
15. माझे वेळ तुझ्या हातात आहे. [QBR] मला माझ्या शत्रूंच्या आणि जे माझा पाठलाग करतात त्यांच्या हातातून सोडव. [QBR]
16. तुझ्या सेवकावर तुझ्या मुखाचा प्रकाश चमकू दे. [QBR] तुझ्या प्रेमदयेत मला तार. [QBR]
17. परमेश्वरा, मला निराश होऊ देऊ नकोस, कारण मी तुला हाक मारतो, [QBR] दुष्ट निराश केला जावो, मृतलोकांत तो निःशब्द होवो. [QBR]
18. खोटे बोलणारे ओठ शांत केले जावोत, [QBR] जसे ते नितीमानांच्याविरूद्ध असत्य आणि तिरस्काराने उद्धटपणे बोलतात. [QBR]
19. जे तुझा आदर बाळगतात त्यांच्यासाठी तू आपला थोर चांगूलपणा जपून ठेवला आहे, [QBR] जे तुझ्यामध्ये आश्रय घेतात त्यांच्याकरिता तू सर्व मानवजाती समोर घडवून आणतोस. [QBR]
20. त्यांना आपल्या उपस्थितीच्या आश्रयात तू मनुष्याच्या कटापासून लपवशील. [QBR] हिंसक जीभेपासून तू त्यांना मंडपात लपवशील. [QBR]
21. परमेश्वर धन्यवादित असो! [QBR] कारण त्याने बळकट नगरात आपली आश्चर्यकारक प्रेमदया दाखवली आहे. [QBR]
22. मी घाईत म्हणालो, [QBR] मी तुझ्या नजरेसमोरून छेदून टाकलो आहे, [QBR] तरी तू माझी मदतीची विनंती ऐकली, [QBR] जेव्हा मी तुझ्याकडे आरोळी केली. [QBR]
23. अहो सर्व परमेश्वराच्या मागे चालणाऱ्यांनो, त्याच्यावर प्रीती करा. [QBR] कारण परमेश्वर विश्वासू लोकांचे रक्षण करतो. [QBR] परंतु तो गर्विष्ठ्यांची परत फेड करतो. [QBR]
24. जे तुम्ही परमेश्वरावर विश्वास करता, [QBR] बलवान व धैर्यवान व्हा. [PE]