1. {#1श्रद्धेसंबंधी साक्ष }[PS]*मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे, [QE][QS]कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस. [QE][QS]तुझ्या न्यायात मला वाचव. [QE]
2. [QS]माझे ऐक, त्वरीत मला वाचव, [QE][QS]माझ्या आश्रयाचा खडक हो. [QE][QS]माझा तारणारा बळकट दुर्ग असा हो. [QE]
3. [QS]कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस, [QE][QS]तर तुझ्या नामास्तव मला मार्गदर्शन कर आणि मला चालव. [QE]
4. [QS]त्यांनी गुप्तपणे रचलेल्या सापळ्यातून तू मला उपटून बाहेर काढ. [QE][QS]कारण तू माझा आश्रय आहे. [QE]
5. [QS]मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, [QE][QS]हे परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला खंडून घेतले आहे. [QE]
6. [QS]जे निरुपयोगी मूर्तींची सेवा करतात, त्यांचा मी तिरस्कार करतो. [QE][QS]परंतु मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो. [QE]
7. [QS]तुझ्या प्रेमदयेमध्ये मी आनंद आणि हर्ष करीन, [QE][QS]कारण तू माझे दु:ख पाहिले आहेस. [QE]
8. [QS]तू मला माझ्या शत्रूंच्या हाती सोपवून दिले नाहीस. [QE][QS]तू माझा पाय खुल्या विस्तीर्ण जागेत स्थिर केला आहे. [QE]
9. [QS]परमेश्वरा, माझ्यावर दया कर, कारण मी दु:खात आहे. [QE][QS]माझे डोळे, माझा जीव, माझ्या देहासह क्षीण झाला आहे. [QE]
10. [QS]कारण माझे आयुष्य दु:खात [QE][QS]आणि कण्हण्यात माझी वर्षे गेली आहेत. [QE][QS]माझ्या पापांमुळे माझी शक्ती क्षीण झाली आहेत, [QE][QS]आणि माझी हाडे झिजली आहेत. [QE]
11. [QS]माझ्या शत्रूंमुळे लोक माझा तिरस्कार करतात [QE][QS]माझ्या शेजाऱ्यास माझी परिस्थिती भयावह आहे, [QE][QS]आणि जे मला ओखळतात त्यांना मी भय असा झालो आहे. [QE]
12. [QS]मृत पावलेल्या मनुष्यासारखा मी झालो आहे, ज्याची कोणी आठवण करत नाही. [QE][QS]मी फुटलेल्या भांड्यासारखा झालो आहे. [QE]
13. [QS]कारण पुष्कळांनी केलीली निंदा मी ऐकली आहे, [QE][QS]प्रत्येक बाजूनी भयावह बातमी आहे, [QE][QS]ते माझ्याविरुध्द कट करत आहेत. [QE]
14. [QS]परंतु परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. [QE][QS]तूच माझा देव आहेस, असे मी म्हणतो. [QE]
15. [QS]माझे वेळ तुझ्या हातात आहे. [QE][QS]मला माझ्या शत्रूंच्या आणि जे माझा पाठलाग करतात त्यांच्या हातातून सोडव. [QE]
16. [QS]तुझ्या सेवकावर तुझ्या मुखाचा प्रकाश चमकू दे. [QE][QS]तुझ्या प्रेमदयेत मला तार. [QE]
17. [QS]परमेश्वरा, मला निराश होऊ देऊ नकोस, कारण मी तुला हाक मारतो, [QE][QS]दुष्ट निराश केला जावो, मृतलोकांत तो निःशब्द होवो. [QE]
18. [QS]खोटे बोलणारे ओठ शांत केले जावोत, [QE][QS]जसे ते नितीमानांच्याविरूद्ध असत्य आणि तिरस्काराने उद्धटपणे बोलतात. [QE]
19. [QS]जे तुझा आदर बाळगतात त्यांच्यासाठी तू आपला थोर चांगूलपणा जपून ठेवला आहे, [QE][QS]जे तुझ्यामध्ये आश्रय घेतात त्यांच्याकरिता तू सर्व मानवजाती समोर घडवून आणतोस. [QE]
20. [QS]त्यांना आपल्या उपस्थितीच्या आश्रयात तू मनुष्याच्या कटापासून लपवशील. [QE][QS]हिंसक जीभेपासून तू त्यांना मंडपात लपवशील. [QE]
21. [QS]परमेश्वर धन्यवादित असो! [QE][QS]कारण त्याने बळकट नगरात आपली आश्चर्यकारक प्रेमदया दाखवली आहे. [QE]
22. [QS]मी घाईत म्हणालो, [QE][QS]मी तुझ्या नजरेसमोरून छेदून टाकलो आहे, [QE][QS]तरी तू माझी मदतीची विनंती ऐकली, [QE][QS]जेव्हा मी तुझ्याकडे आरोळी केली. [QE]
23. [QS]अहो सर्व परमेश्वराच्या मागे चालणाऱ्यांनो, त्याच्यावर प्रीती करा. [QE][QS]कारण परमेश्वर विश्वासू लोकांचे रक्षण करतो. [QE][QS]परंतु तो गर्विष्ठ्यांची परत फेड करतो. [QE]
24. [QS]जे तुम्ही परमेश्वरावर विश्वास करता, [QE][QS]बलवान व धैर्यवान व्हा. [QE]