मराठी बायबल

देवाची दयाळू भेट
स्तोत्रसंहिता
1. {#1क्षमेची थोरवी }[PS]*दाविदाचे स्तोत्र; मासकील (शिक्षण) *[PE][QS]ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत [QE][QS]ते आशीर्वादित आहेस. [QE]
2. [QS]परमेश्वर ज्याच्या ठायी काही अपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे. [QE]
3. [QS]मी गप्प राहिलो, तेव्हा पूर्ण दिवस माझ्या, [QE][QS]ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली. [QE]
4. [QS]कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता. [QE][QS]उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे. [QE]
5. [QS]तेव्हा मी परमेश्वरासमोर माझे अपराध कबूल केले, [QE][QS]आणि मी माझा अपराध लपवला नाही, [QE][QS]मी म्हणालो, परमेश्वरासमोर मी आपले पाप कबूल करीन, [QE][QS]आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस. [QE]
6. [QS]याच कारणास्तव प्रत्येक देवभक्त तू पावशील तेव्हा तुझी प्रार्थना करो. [QE][QS]संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत. [QE]
7. [QS]तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटांपासून वाचवशील, [QE][QS]विजयाच्या गीताने तू मला वेढशील. (सेला) [QE]
8. [QS]परमेश्वर म्हणतो, “मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात, तू चालावे तो मी तुला शिकवीन. [QE][QS]तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन. [QE]
9. [QS]म्हणून घोड्यासारखा व गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, ज्यांना काही समजत नाही. [QE][QS]त्यांना आवरण्यासाठी लगाम व बागदोर असलाच पाहिजे. नाहीतर ते तुमच्या जवळ येणार नाहीत.” [QE]
10. [QS]वाईट लोकांस खूप दु:ख भोगावे लागेल, [QE][QS]परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे. [QE]
11. [QS]अहो न्यायी जनहो, परमेश्वराच्या ठायी आनंद व हर्ष करा. [QE][QS]अहो सरळ जनहो हर्षाने तुम्ही जल्लोष करा. [QE]
Total 150 अध्याय, Selected धडा 32 / 150
क्षमेची थोरवी 1 *दाविदाचे स्तोत्र; मासकील (शिक्षण) *ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे, ज्याचे अपराध झाकले गेले आहेत ते आशीर्वादित आहेस. 2 परमेश्वर ज्याच्या ठायी काही अपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे. 3 मी गप्प राहिलो, तेव्हा पूर्ण दिवस माझ्या, ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली. 4 कारण रात्रंदिवस तुझा हात माझ्यावर भारी होता. उन्हाळ्यात उष्णतेमुळे माझी शक्ती सुकून गेली आहे. 5 तेव्हा मी परमेश्वरासमोर माझे अपराध कबूल केले, आणि मी माझा अपराध लपवला नाही, मी म्हणालो, परमेश्वरासमोर मी आपले पाप कबूल करीन, आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस. 6 याच कारणास्तव प्रत्येक देवभक्त तू पावशील तेव्हा तुझी प्रार्थना करो. संकटे जेव्हा महापुरासारखी येतात तेव्हा ती तुझ्या भक्तांपर्यंत नक्कीच जाणार नाहीत. 7 तू माझे लपण्याचे ठिकाण आहेस. तू मला संकटांपासून वाचवशील, विजयाच्या गीताने तू मला वेढशील. (सेला) 8 परमेश्वर म्हणतो, “मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात, तू चालावे तो मी तुला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला बोध करीन. 9 म्हणून घोड्यासारखा व गाढवासारखा मूर्ख होऊ नकोस, ज्यांना काही समजत नाही. त्यांना आवरण्यासाठी लगाम व बागदोर असलाच पाहिजे. नाहीतर ते तुमच्या जवळ येणार नाहीत.” 10 वाईट लोकांस खूप दु:ख भोगावे लागेल, परंतु जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात त्यांच्या भोवती देवाच्या खऱ्या प्रेमाचे कडे आहे. 11 अहो न्यायी जनहो, परमेश्वराच्या ठायी आनंद व हर्ष करा. अहो सरळ जनहो हर्षाने तुम्ही जल्लोष करा.
Total 150 अध्याय, Selected धडा 32 / 150
×

Alert

×

Marathi Letters Keypad References