1. {#1उत्पन्नकर्त्याची व संरक्षकाची महती } [QS]न्यायी जनहो! परमेश्वरामध्ये आनंद करा, [QE][QS]न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा. [QE]
2. [QS]वीणा वाजवून परमेश्वरास धन्यवाद द्या; [QE][QS]दहा तारांच्या वाद्यावर त्याचे गुणगान गा. [QE]
3. [QS]त्याच्यासाठी नवे गीत गा; [QE][QS]मोठा आवाज करून कौशल्याने वाद्ये वाजवा. [QE]
4. [QS]कारण परमेश्वरचे वचन सरळ आहे, [QE][QS]आणि तो जे करतो ते प्रामाणिकपणाने करतो. [QE]
5. [QS]देवाला चांगलुपणा आणि न्यायीपण प्रिय आहे, [QE][QS]परमेश्वराच्या प्रेमदयेने पृथ्वी भरलेली आहे. [QE]
6. [QS]परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली [QE][QS]आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत. [QE]
7. [QS]तो समुद्रातील पाणी ढीगासारखे एकत्र करतो, [QE][QS]तो समुद्र कोठारामध्ये ठेवतो. [QE]
8. [QS]सर्व पृथ्वी परमेश्वराचे भय बाळगो, [QE][QS]जगात राहणारा प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो. [QE]
9. [QS]कारण तो बोलला आणि ते झाले, [QE][QS]त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले. [QE]
10. [QS]राष्ट्रांचा उपदेश परमेश्वर मोडतो, [QE][QS]तो लोकांच्या योजनांवर अधिकार करतो. [QE]
11. [QS]परंतु परमेश्वराच्या योजना सर्वकाळ राहतात, [QE][QS]त्याच्या हृदयातील योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात. [QE]
12. [QS]परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव आहे ते राष्ट्र आशीर्वादित आहे. [QE][QS]ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत. [QE]
13. [QS]परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतो, [QE][QS]तो सर्व लोकांस पाहातो. [QE]
14. [QS]तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून [QE][QS]पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो. [QE]
15. [QS]ज्याने सर्वांची हृदये घडवली तो [QE][QS]त्या सर्वांची कृत्ये पारखतो, तोच तो आहे. [QE]
16. [QS]पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही. [QE][QS]वीर योद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही. [QE]
17. [QS]घोडा विजयासाठी व्यर्थ आहे. [QE][QS]त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचवू शकत नाही. [QE]
18. [QS]पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. [QE][QS]जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात, [QE]
19. [QS]त्यांना मरणापासून, [QE][QS]आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे. [QE]
20. [QS]आम्ही परमेश्वराची वाट पाहू, [QE][QS]तो आमचे साहाय्य आणि आमची ढाल आहे. [QE]
21. [QS]त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते, [QE][QS]कारण आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो. [QE]
22. [QS]परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे [QE][QS]त्याप्रमाणे तुझी प्रेमदया आम्हाबरोबर असू दे. [QE]