1. {#1पीडेपासून झालेल्या मुक्ततेबद्दल उपकारस्तुती }[PS]*दाविदाचे स्तोत्र; त्याने अबीमलेखापुढे आपली चर्या बदलल्यावर त्यास त्याने हाकलून लावले, आणि तो तेथून निघून गेला तेव्हाचे त्याचे गीत. *[PE][QS]मी सर्व समयी परमेश्वरास स्तुती देईन. [QE][QS]माझ्या मुखात नेहमी त्याची स्तुती असेल. [QE]
2. [QS]मी परमेश्वराची स्तुती करणार, [QE][QS]विनम्र ऐकतील आणि आनंद करतील. [QE]
3. [QS]तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वरास स्तुती द्या. [QE][QS]आपण एकत्र त्याच्या नावाला उंचावू या. [QE]
4. [QS]मी परमेश्वराकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने मला उत्तर दिले. [QE][QS]आणि त्याने मला माझ्या सर्व भयांवर विजय दिला. [QE]
5. [QS]जे त्याच्याकडे पाहतील ते चकाकतील, [QE][QS]आणि त्यांची मुखे कधीच लज्जीत होणार नाहीत. [QE]
6. [QS]या पीडलेल्या मनुष्याने आरोळी केली, आणि परमेश्वराने त्याचे ऐकले [QE][QS]आणि त्यास त्याच्या सर्व संकटातून सोडवले. [QE]
7. [QS]परमेश्वराचे भय धरणाऱ्याभोवती तो छावणी करतो. [QE][QS]आणि त्यास वाचवतो. [QE]
8. [QS]परमेश्वर किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहा. [QE][QS]धन्य तो पुरुष जो त्याच्याठायी आश्रय घेतो. [QE]
9. [QS]जे तुम्ही त्याचे निवडलेले आहा, ते तुम्ही परमेश्वराचे भय धरा. [QE][QS]त्याचे भय धरणाऱ्यांस कशाचीच कमतरता भासत नाही. [QE]
10. [QS]तरुण सिंहाना देखील उणे पडते आणि ते भुकेले होतात, [QE][QS]परंतु जे परमेश्वरास शोधतात त्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टींची उणीव पडणार नाही. [QE]
11. [QS]मुलांनो माझे ऐका [QE][QS]आणि मी तुम्हास परमेश्वराचे भय कसे धरावे हे शिकवीन. [QE]
12. [QS]सुख पाहण्यासाठी आयुष्याची इच्छा धरतो आणि दिवसाची आवड धरतो तो मनुष्य कोण आहे? [QE]
13. [QS]तर वाईट बोलण्यापासून आवर, [QE][QS]आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर. [QE]
14. [QS]वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर. [QE][QS]शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग. [QE]
15. [QS]परमेश्वराची दृष्टी नितीमानांवर आहे, [QE][QS]त्याचे कान त्याच्या आरोळीकडे असतात. [QE]
16. [QS]परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्याविरुध्द आहे. [QE][QS]तो त्यांची आठवण पृथ्वीतून नाश करतो. [QE]
17. [QS]नितीमान आरोळी करतो आणि परमेश्वर ते ऐकतो, [QE][QS]आणि तो तुम्हास तुमच्या सर्व संकटातून वाचवेल. [QE]
18. [QS]जे हृदयाने तुटलेले आहेत, त्यांच्याजवळ परमेश्वर आहे. [QE][QS]आणि तो खिन्न झालेल्या आत्म्यास तारतो. [QE]
19. [QS]नितीमानाचे कष्ट पुष्कळ आहेत, [QE][QS]परंतू परमेश्वर त्या सर्वांवर त्यांना विजय मिळवून देईल. [QE]
20. [QS]परमेश्वर त्याच्या सर्व हाडाचे रक्षण करेल. [QE][QS]त्यांतले एकही हाड तो मोडू देणार नाही. [QE]
21. [QS]परंतु दुष्टाई दुष्टाला मारुन टाकील, [QE][QS]जो नितीमानाचा द्वेष करतो तो दोषी ठरवला जाईल. [QE]
22. [QS]परमेश्वर त्याच्या सेवकाच्या आत्म्यांना तारेल. [QE][QS]त्याच्यात आश्रय घेणारा कोणीही दोषी ठरवला जाणार नाही. [QE]