1. {#1शत्रूंच्या हातून सुटण्यासाठी प्रार्थना }[PS]*दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]हे परमेश्वरा जे माझ्याशी विरोध करतात त्यांच्याशी तू विरोध कर. [QE][QS]जे माझ्याविरूद्ध लढतात त्यांच्याविरुद्ध तू लढ. [QE]
2. [QS]तुझी मोठी आणि छोटी ढाल घे, [QE][QS]उठून मला मदत कर. [QE]
3. [QS]जे माझ्या पाठीस लागतात त्यांच्याविरुद्ध आपला भाला आणि कुऱ्हाड वापर. [QE][QS]माझ्या जीवास असे म्हण, मी तुझा तारणारा आहे. [QE]
4. [QS]जे माझ्या जीवाच्या शोधात आहेत, ते लाजवले जावो आणि अप्रतिष्ठीत होवोत. [QE][QS]जे माझे वाईट योजितात ते मागे फिरले जावोत व गोंधळले जावोत. [QE]
5. [QS]ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भूशासारखे होवोत [QE][QS]आणि परमेश्वराचा दूत त्यांना पळवून लावो. [QE]
6. [QS]त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. [QE][QS]परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करो. [QE]
7. [QS]विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे. [QE][QS]विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे. [QE]
8. [QS]त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो, [QE][QS]त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकू दे. [QE][QS]त्यांच्याच नाशात ते पडोत. [QE]
9. [QS]परंतु मी परमेश्वराच्या ठायी आनंदी असेन, [QE][QS]आणि त्याच्या तारणात मी हर्ष करीन. [QE]
10. [QS]माझ्या सर्व शक्तीने मी म्हणेन, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? [QE][QS]जो तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस. [QE][QS]आणि गरीबांना आणि गरजवंताना त्याच्या लुटणाऱ्यांपासून सोडवतो. [QE]
11. [QS]अनितीमान साक्षी उठल्या आहेत; [QE][QS]ते माझ्यावर खोटा आरोप लावतात. [QE]
12. [QS]माझ्या चांगल्या बद्दल ते मला वाईट परत फेड करतात. [QE][QS]मी दु:खी आहे. [QE]
13. [QS]परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले, [QE][QS]मी त्यांच्या करता उपवास केला, [QE][QS]मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही. [QE]
14. [QS]मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे. [QE][QS]मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे. [QE]
15. [QS]परंतु मी अडखळलो असता, त्यांनी एकत्र येऊन हर्ष केला. [QE][QS]मला माहित नसता ते माझ्याविरूद्ध एकत्र जमले. [QE]
16. [QS]आदर न बाळगता त्यांनी माझी थट्ट केली. [QE][QS]त्यांनी आपले दातओठ माझ्यावर खाल्ले. [QE]
17. [QS]परमेश्वरा, तू किती वेळ नुसता बघत राहाणार आहेस? [QE][QS]माझा जीव नाश करणाऱ्या हल्यांपासून आणि माझे जीवन सिंहापासून वाचव. [QE]
18. [QS]मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. [QE][QS]लोकांमध्ये मी तुझी स्तुती करेन. [QE]
19. [QS]माझ्या शत्रूंस अन्यायाने माझ्यावर हर्ष करू देऊ नको. [QE]
20. [QS]कारण ते शांतीने बोलत नाही, [QE][QS]परंतु ते देशातील शांततापूर्ण असणाऱ्यांविरूद्ध कपटाच्या गोष्टी बोलतात. [QE]
21. [QS]ते आपले मुख माझ्याविरोधात उघडतात, [QE][QS]ते म्हणतात, अहाहा, अहाहा, आमच्या डोळ्यांने हे पाहिले आहे. [QE]
22. [QS]हे परमेश्वरा, तू हे पाहिले आहेस? तर शांत राहू नको. [QE][QS]देवा, माझ्यापासून दूर राहू नको. [QE]
23. [QS]हे देवा, माझ्या प्रभू, ऊठ, माझ्या न्यायासाठी आणि वादासाठी लढ. [QE]
24. [QS]परमेश्वरा माझ्या देवा, माझे रक्षण कर, [QE][QS]तुझ्या न्यायीपणामुळे, त्यांना माझ्यावर हर्ष नको करू देऊ. [QE]
25. [QS]“आम्हांला हवे होते ते मिळाले,” असे त्यांना आपल्या हृदयात नको बोलू देऊ. [QE][QS]“आम्ही त्याचा नाश केला” असे त्यांना म्हणू देऊ नकोस. [QE]
26. [QS]जे माझ्या वाईटावर उठले आहेत, ते सगळे लज्जीत होवो आणि गोंधळून जावो. [QE][QS]जे माझी थट्टा करतात ते लज्जेत आणि अप्रतिष्ठेत झाकले जावो. [QE]
27. [QS]जे माझ्या इच्छेला समर्थन करतात ते हर्षनाद करोत आणि आनंदी होवोत. [QE][QS]जे आपल्या सेवकाच्या कल्याणात हर्ष पावतात, परमेश्वराची स्तुती असो, असे ते सतत म्हणोत. [QE]
28. [QS]तेव्हा मी तुझ्या न्यायाबद्दल सांगेन, [QE][QS]आणि तुझी स्तुती दिवसभर करीन. [QE]