1. {देवाचे अढळ प्रेम} [PS] दुष्टाचा अपराध त्याच्या हृदयात सांगत असतो की, [QBR] त्याच्या दृष्टीत देवाचे काही भय नाही. [QBR]
2. त्याचे अपराध उघडकीस येणार नाही आणि त्याचा द्वेष केला जाणार नाही, [QBR] अशा भ्रमात तो राहत असतो. [QBR]
3. त्याचे शब्द कपटी आणि पापमय असतात. [QBR] तो शहाणा होण्यास किंवा सत्कृत्ये करण्यास इच्छीत नाही. [QBR]
4. तो आपल्या बिछान्यावर पडून असता, तो अपराधाच्या योजना आखतो. [QBR] तो वाईट मार्गाच्या योजना करतो, [QBR] तो वाईटाचा धिक्कार करत नाही. [QBR]
5. हे परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे; [QBR] तुझी एकनिष्ठता आभाळापर्यंत पोहचली आहे. [QBR]
6. परमेश्वरा तुझे न्यायीपण उंच पर्वतासारखे आहे. [QBR] तुझा न्याय खोल समुद्रासारखा आहे. [QBR] परमेश्वरा तू मनुष्यास आणि प्राण्यांस दोघांस राखतो. [QBR]
7. देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे. [QBR] मानवजात तुझ्या पंखांच्या सावलित आश्रय घेते. [QBR]
8. ते तुझ्या घरातल्या समृद्धीमुळे तृप्त होतील. [QBR] तू आपल्या बहुमोल नदीतून त्यांना मनसोक्त पिण्यास देशील. [QBR]
9. कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. [QBR] तुझ्या प्रकाशात आम्ही प्रकाश पाहू. [QBR]
10. राजे तुला ओळखतात त्यांच्याकरिता तू आपली प्रेमदया विस्तीर्ण कर, [QBR] तुझी सुरक्षितता सरळांसोबत असू दे. [QBR]
11. गर्विष्ठांचे पाय माझ्याजवळ येऊ देऊ नकोस. [QBR] दुष्टाचा हात मला घालवून न देवो. [QBR]
12. तेथे दुष्ट पडले आहेत, [QBR] ते पाडले गेले आहेत आणि ते कधीही उभे राहू शकणार नाहीत. [PE]