1. {दुष्ट व देवभक्त ह्यांचे भवितव्य} [PS] दुष्टकृत्ये करणाऱ्यांवर चिडू नकोस, [QBR] जे अनीतीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस. [QBR]
2. कारण ते लवकरच गवतासारखे वाळून जातील; [QBR] व हिरव्या वनस्पतीसारखे सुकून जातील. [QBR]
3. परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर; [QBR] देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर. [QBR]
4. परमेश्वरामध्ये आनंद कर, [QBR] आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल. [QBR]
5. तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, [QBR] त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील. [QBR]
6. तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे [QBR] आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील. [QBR]
7. परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा. [QBR] जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो, [QBR] तर काळजी करू नको. [QBR]
8. रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. [QBR] त्याने फक्त त्रास होतो. [QBR]
9. कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील, [QBR] परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल. [QBR]
10. थोड्याच काळात दुष्ट नाहीसे होतील; [QBR] तू त्यांच्या ठिकाणाकडे बघशील, परंतु ते सापडणार नाहीस. [QBR]
11. परंतु नम्र पृथ्वीचे वतन मिळवतील, [QBR] आणि मोठ्या समृद्धित ते हर्ष करतील. [QBR]
12. दुष्ट मनुष्य नितीमानाच्या विरोधात योजना आखतो, [QBR] आणि त्याच्याविरुध्द आपले दातओठ खातो. [QBR]
13. प्रभू त्यास हसत आहे, [QBR] कारण त्याचा दिवस येत आहे, हे तो पाहत आहे. [QBR]
14. जे पीडलेले आणि गरजवंत आणि जे सरळ आहेत, [QBR] त्यांना ठार मारण्यास दुष्टांनी आपली तलवार उपसली आहे आणि आपले धनुष्य वाकविले आहेत. [QBR]
15. परंतु त्यांचे धनुष्य मोडले जातील व त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदतील. [QBR]
16. अनेक दुष्ट लोकांच्या विपुलतेपेक्षा, [QBR] नितीमानाकडे जे थोडे ते उत्तम आहे. [QBR]
17. कारण दुष्ट लोकांचे बाहू मोडले जातील [QBR] परंतु परमेश्वर नितीमानांना आधार देईल. [QBR]
18. परमेश्वर निर्दोषास दिवसेन दिवस बघतो, [QBR] आणि त्यांचे वतन सदैव राहील. [QBR]
19. वाईट समयी ते लज्जीत होणार नाहीत. [QBR] जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्यांच्याकडे खाण्यास पुरेसे असेल. [QBR]
20. परंतु दुष्ट मनुष्य नाश पावतील, [QBR] परमेश्वराचे शत्रू कुरणाच्या शोभेसारखे होतील; [QBR] ते नाश होतील आणि धुरामध्ये नाहीसे होतील. [QBR]
21. दुष्ट पैसे उसने घेतो परंतु त्याची परत फेड करत नाही. [QBR] परंतु नितीमान मनुष्य उदारतेने देतो. [QBR]
22. जे देवाकडून आशीर्वादित झालेले आहेत, ते भूमीचे वतन पावतील; [QBR] आणि जे त्याच्याकडून शापित आहेत, ते छेदून टाकले जातील. [QBR]
23. मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केली जातात, [QBR] असा मनुष्य ज्याचे मार्ग देवाच्या दृष्टीने प्रशंसनीय असतात. [QBR]
24. जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही. [QBR] कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील. [QBR]
25. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे; [QBR] तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही. [QBR]
26. सारा दिवस तो दयाळूपणाने वागतो आणि उसने देतो, [QBR] त्याची संतती आशीर्वादित असते. [QBR]
27. वाईटापासून फिर आणि चांगले ते कर. [QBR] तेव्हा तू सर्वकाळासाठी वाचवला जाशील. [QBR]
28. कारण परमेश्वरास न्याय प्रिय आहे [QBR] आणि तो विश्वासाने त्याच्यामागे चालणाऱ्यांस सोडत नाही. [QBR] ते सर्वकाळासाठी राखून ठेवलेले आहेत. [QBR] परंतु दुष्टाचे वंशज छेदले जातील. [QBR]
29. नितीमान तर पृथ्वीचे वतन पावतील [QBR] आणि सर्वकाळ त्यामध्ये वस्ती करतील. [QBR]
30. नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते, [QBR] आणि न्याय वाढवते. [QBR]
31. त्याच्या हृदयात त्याच्या देवाचे नियमशास्त्र असते, [QBR] त्याचे पाय कधी घसरणार नाहीत. [QBR]
32. परंतु दुष्ट मनुष्य हा नितीमान मनुष्यास बघतो, [QBR] आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो. [QBR]
33. परंतु परमेश्वर त्यांना दुष्ट मनुष्याच्या हातात त्यागणार नाही. [QBR] किंवा जेव्हा त्याचा न्याय होईल तेव्हा त्यास अपराधी ठरवणार नाही. [QBR]
34. परमेश्वराची वाट पाहा आणि त्याचे मार्ग पाळ. [QBR] आणि तो तुला वर उचलणार म्हणजे तुला भूमी मिळेल. [QBR] जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील. [QBR]
35. मी विस्तारलेल्या आणि सशक्त झाडासारखा एक दुष्ट मनुष्य पाहिला. [QBR] जो आपले मूळ जमिनीत पसरवतो. [QBR]
36. परंतु जेव्हा मी त्याच्यापासून पुन्हा गेलो, तर तो तेथे नव्हता. [QBR] मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही. [QBR]
37. प्रमाणिक माणसाकडे लक्ष लाव आणि सरळास निशाणी लाव. [QBR] कारण शांततेत राहण्याऱ्या मनुष्याचे भविष्य चांगले असते. [QBR]
38. पापी तर पूर्णपणे नाश पावतील, [QBR] परंतू दुष्टाचा भावीकाळ छेदून टाकला जाईल. [QBR]
39. नितीमानाचे तारण हे परमेश्वराकडून येते, [QBR] संकटसमयी तो त्यांचे रक्षण करीन. [QBR]
40. परमेश्वर त्यांना मदत करील आणि त्यांना तारील, [QBR] तो त्यांचा वाईट लोकांपासून बचाव करतो, [QBR] कारण त्यांनी परमेश्वराच्याठायी आश्रय घेतला आहे. [PE]