1. {#1पश्चातापी अंतःकरणाची प्रार्थना }[PS]*आठवण देण्यासाठी, दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]परमेश्वरा, तुझ्या क्रोधात मला ताडना करू नकोस, [QE][QS]आणि तुझ्या कोपात मला शिक्षा करू नकोस. [QE]
2. [QS]कारण तुझे बाण मला छेदतात, [QE][QS]आणि तुझा हात मला खाली दाबतो आहे. [QE]
3. [QS]माझे सर्व शरीर तुझ्या क्रोधाने आजारी झाले आहे. [QE][QS]आणि माझ्या अपराधांमुळे माझ्या हाडांत स्वस्थता नाही. [QE]
4. [QS]कारण माझ्या वाईट गोष्टींनी मला दडपून टाकले आहे. [QE][QS]ते माझ्याकरिता फार जड असे ओझे झाले आहे. [QE]
5. [QS]माझ्या पापाच्या मूर्खपणामुळे, [QE][QS]माझ्या जखमा संसर्गजन्य आणि दुर्गंधित झाल्या आहेत. [QE]
6. [QS]मी वाकलो आहे आणि प्रत्येक दिवशी मानहानी होते; [QE][QS]दिवसभर मी शोक करतो. [QE]
7. [QS]कारण लज्जेने मला गाठले आहे, [QE][QS]आणि माझे सर्व शरीर आजारी आहे. [QE]
8. [QS]मी बधिर आणि पूर्णपणे ठेचला गेलो आहे. [QE][QS]आपल्या हृदयाच्या तळमळीने मी कण्हतो. [QE]
9. [QS]हे प्रभू, तू माझ्या हृदयाची खोल उत्कंठ इच्छा समजतोस, [QE][QS]आणि माझे कण्हणे तुझ्यापासून लपले नाही. [QE]
10. [QS]माझे हृदय धडधडत आहे, माझी शक्ती क्षीण झाली आहे [QE][QS]आणि माझी दृष्टीही अंधुक झाली आहे. [QE]
11. [QS]माझ्या परिस्थितीमुळे माझे मित्र आणि माझे सोबती मला टाळतात, [QE][QS]माझे शेजारी माझ्यापासून लांब उभे राहतात. [QE]
12. [QS]जे माझा जीव घेऊ पाहतात ते माझ्यासाठी पाश मांडतात. [QE][QS]जे माझी हानी करू पाहतात ते दिवसभर विध्वंसक [QE][QS]आणि कपटाचे शब्द बोलतात. [QE]
13. [QS]मी तर बहिर्यासारखा होऊन ऐकत नाही; [QE][QS]मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही. [QE]
14. [QS]ऐकू न येणाऱ्या माणसासारखा मी आहे, [QE][QS]ज्याच्याकडे काही उत्तर नाही. [QE]
15. [QS]परमेश्वरा, खचित मी तुझी वाट पाहीन. [QE][QS]प्रभू माझ्या देवा, तू मला उत्तर देशील. [QE]
16. [QS]कारण मी जर म्हणालो तू उत्तर दिले नाही, तर माझे शत्रू माझ्यावर आनंद करतील. [QE][QS]जर माझा पाय घसरला, तर ते भयानक गोष्टी करतील. [QE]
17. [QS]कारण मी अडखळून पडण्याच्या बेतास आलो आहे, [QE][QS]आणि मी सतत यातनेत आहे. [QE]
18. [QS]मी माझा अपराध कबूल करतो; [QE][QS]मी माझ्या पापासंबंधी चिंताकुल आहे. [QE]
19. [QS]परंतु माझे शत्रू असंख्य आहेत; [QE][QS]जे माझा वाईटाने द्वेष करतात ते पुष्कळ आहेत. [QE]
20. [QS]माझ्या चांगल्याची परतफेड ते वाईटाने करतात. [QE][QS]जरी मी चांगले अनुसरलो. तरी माझ्यावर ते दोषारोपण करतात. [QE]
21. [QS]हे परमेश्वरा, मला सोडू नकोस; [QE][QS]माझ्या देवा, माझ्यापासून दूर राहू नकोस. [QE]
22. [QS]हे प्रभू, माझ्या तारणाऱ्या, [QE][QS]माझे साहाय्य करण्यास त्वरा कर. [QE]