1. {सुटकेबद्दल उरकारस्तुती} PS मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली,
त्याने माझे रडणे ऐकले आणि माझ्याकडे आपला कान लावला. |
2. त्याने मला भयानक खाचेतून दलदलीच्या चिखलातून बाहेर काढले,
आणि त्याने माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थीर केली. |
3. आमच्या देवाची स्तुती, हे नवीन गाणे त्याने माझ्या मुखात घातले,
पुष्कळ लोक त्यास पाहतील आणि त्याचा आदर करतील. आणि ते परमेश्वरावर विश्वास ठेवतील. |
4. जो पुरुष परमेश्वरास आपला विश्वास करतो,
आणि गर्विष्ठांना किंवा जे खोट्यासाठी त्याच्याकडून फिरले आहेत त्यांना मानत नाही, ते आशीर्वादित आहेत. |
5. परमेश्वरा, माझ्या देवा, तू केलेली आश्चर्याची कृत्ये पुष्कळ आहेत.
आणि आमच्यासाठी तुझे विचार मोजले जाणार नाहीत इतके आहेत. जर मी त्यांच्याबद्दल बोलायचे म्हटले तर, ते मोजण्यापलीकडचे आहेत. |
6. यज्ञ आणि अन्नार्पण यांमध्ये तुला आनंद नाही.
परंतु तू माझे कान उघडले आहेत. होमार्पणे किंवा पापार्पणे तू मागत नाहीस. |
10. तुझे न्यायीपण मी आपल्या हृदयात लपवून ठेवले नाही.
तुझा विश्वासूपणा आणि तुझे तारण मी घोषित केले. तुझी प्रेमदया किंवा सत्य मी मोठ्या सभेत लपवून ठेवले नाही. |
11. यास्तव हे परमेश्वरा, तू तुझी दयाळूपणाची कृत्ये माझ्यापासून आवरून धरू नको.
तुझी प्रेमदया आणि तुझी सत्यता मला नेहमीच राखो. |
12. कारण असंख्य वाईटाने मला वेढले आहे.
मी वर पाहण्यास सक्षम नाही, कारण माझ्या अपराधांनी मला गाठले आहे. माझ्या डोक्यावर असलेल्या केसांपेक्षा ते जास्त आहेत. म्हणून माझे हृदय खचले आहे. |
16. परंतु जे सर्व तुला शोधतात, ते तुझ्यामध्ये हर्ष व आनंद करोत.
ज्या सर्वांना तुझे तारण प्रिय आहे ते सर्व परमेश्वराचा महिमा वाढो, असे नेहमी म्हणोत. |
17. मी गरीब आणि दीन आहे,
तरी प्रभू माझा विचार करतो. तू माझे साहाय्य आणि मला वाचवणारा आहेस. माझ्या देवा, उशीर करू नकोस. PE |