1. {#1रोगनिवारणार्थ प्रार्थना }[PS]*मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]जो मनुष्य गरीबांची चिंता करतो तो आशीर्वादित आहे. [QE][QS]त्याच्या संकटाच्या दिवशी परमेश्वर त्यास वाचवेल. [QE]
2. [QS]परमेश्वर त्यास राखेल आणि त्यास जिवंत ठेवेल. [QE][QS]आणि पृथ्वीवर तो आशीर्वादित होईल. [QE][QS]परमेश्वर त्यास त्याच्या शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाही. [QE]
3. [QS]तो अंथरुणावर दुखणाईत असता परमेश्वर त्यास आधार देईल. [QE][QS]तू त्याचे आजाराचे अंथरुण आरोग्यामध्ये पालटशील. [QE]
4. [QS]मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर. [QE][QS]माझा जीव निरोगी कर, कारण मी तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.” [QE]
5. [QS]माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात, [QE][QS]“तो कधी मरेल आणि त्याचे नाव विस्मरणात जाईल?” [QE]
6. [QS]माझे शत्रू मला पाहायला आले असता ते व्यर्थ शब्द बोलतात. [QE][QS]त्यांचे हृदय माझ्यासाठी खोटी साक्ष गोळा करते. [QE][QS]जेव्हा ते माझ्यापासून दूर जातात तर दुसऱ्यांना देखील हेच सांगतात. [QE]
7. [QS]माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात, [QE][QS]ते माझ्याविरूध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात. [QE]
8. [QS]ते म्हणतात, “त्याला वाईट रोग पकडून ठेवो. [QE][QS]म्हणजे तो पडून राहो, तो कधीच उठणार नाही, असे ते म्हणतात.” [QE]
9. [QS]माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला. [QE][QS]मी त्याच्यावर विश्वास ठेवला. [QE][QS]पण आता तो माझ्याविरूद्ध गेला आहे. [QE]
10. [QS]परंतू हे परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर आणि मला उठून उभे कर. [QE][QS]म्हणजे मग मी त्यांची परतफेड करेन. [QE]
11. [QS]माझे वैरी माझ्यावर जयोत्सोव करत नाही, [QE][QS]यावरुन मी जाणतो की, तू माझ्या ठायी संतोष पावतोस. [QE]
12. [QS]मला तर तू माझ्या प्रामाणिकपणात पाठिंबा देतोस, [QE][QS]आणि सदासर्वकाळ आपल्या मुखापुढे ठेवतोस. [QE]
13. [QS]परमेश्वर, इस्राएलाच्या देवाची [QE][QS]अनादिकाळापासून तर सर्वकाळापर्यंत स्तुती असो, [QE][QS]आमेन, आमेन. [QE]