1. {रोगनिवारणार्थ प्रार्थना} PS जो मनुष्य गरीबांची चिंता करतो तो आशीर्वादित आहे.
त्याच्या संकटाच्या दिवशी परमेश्वर त्यास वाचवेल. |
2. परमेश्वर त्यास राखेल आणि त्यास जिवंत ठेवेल.
आणि पृथ्वीवर तो आशीर्वादित होईल. परमेश्वर त्यास त्याच्या शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाही. |
3. तो अंथरुणावर दुखणाईत असता परमेश्वर त्यास आधार देईल.
तू त्याचे आजाराचे अंथरुण आरोग्यामध्ये पालटशील. |
4. मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर.
माझा जीव निरोगी कर, कारण मी तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.” |
6. माझे शत्रू मला पाहायला आले असता ते व्यर्थ शब्द बोलतात.
त्यांचे हृदय माझ्यासाठी खोटी साक्ष गोळा करते. जेव्हा ते माझ्यापासून दूर जातात तर दुसऱ्यांना देखील हेच सांगतात. |
8. ते म्हणतात, “त्याला वाईट रोग पकडून ठेवो.
म्हणजे तो पडून राहो, तो कधीच उठणार नाही, असे ते म्हणतात.” |
9. माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला.
मी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आता तो माझ्याविरूद्ध गेला आहे. |