1. {रोगनिवारणार्थ प्रार्थना} [PS] जो मनुष्य गरीबांची चिंता करतो तो आशीर्वादित आहे. [QBR] त्याच्या संकटाच्या दिवशी परमेश्वर त्यास वाचवेल. [QBR]
2. परमेश्वर त्यास राखेल आणि त्यास जिवंत ठेवेल. [QBR] आणि पृथ्वीवर तो आशीर्वादित होईल. [QBR] परमेश्वर त्यास त्याच्या शत्रूंच्या इच्छेवर सोडणार नाही. [QBR]
3. तो अंथरुणावर दुखणाईत असता परमेश्वर त्यास आधार देईल. [QBR] तू त्याचे आजाराचे अंथरुण आरोग्यामध्ये पालटशील. [QBR]
4. मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर. [QBR] माझा जीव निरोगी कर, कारण मी तुझ्याविरूद्ध पाप केले आहे.” [QBR]
5. माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात. ते म्हणतात, [QBR] “तो कधी मरेल आणि त्याचे नाव विस्मरणात जाईल?” [QBR]
6. माझे शत्रू मला पाहायला आले असता ते व्यर्थ शब्द बोलतात. [QBR] त्यांचे हृदय माझ्यासाठी खोटी साक्ष गोळा करते. [QBR] जेव्हा ते माझ्यापासून दूर जातात तर दुसऱ्यांना देखील हेच सांगतात. [QBR]
7. माझे शत्रू माझ्याबद्दलच्या वाईट गोष्टी कुजबुजतात, [QBR] ते माझ्याविरूध्द वाईट गोष्टींच्या योजना आखतात. [QBR]
8. ते म्हणतात, “त्याला वाईट रोग पकडून ठेवो. [QBR] म्हणजे तो पडून राहो, तो कधीच उठणार नाही, असे ते म्हणतात.” [QBR]
9. माझा सर्वांत चांगला मित्र माझ्याबरोबर जेवला. [QBR] मी त्याच्यावर विश्वास ठेवला. [QBR] पण आता तो माझ्याविरूद्ध गेला आहे. [QBR]
10. परंतू हे परमेश्वरा, तू माझ्यावर दया कर आणि मला उठून उभे कर. [QBR] म्हणजे मग मी त्यांची परतफेड करेन. [QBR]
11. माझे वैरी माझ्यावर जयोत्सोव करत नाही, [QBR] यावरुन मी जाणतो की, तू माझ्या ठायी संतोष पावतोस. [QBR]
12. मला तर तू माझ्या प्रामाणिकपणात पाठिंबा देतोस, [QBR] आणि सदासर्वकाळ आपल्या मुखापुढे ठेवतोस. [QBR]
13. परमेश्वर, इस्राएलाच्या देवाची [QBR] अनादिकाळापासून तर सर्वकाळापर्यंत स्तुती असो, [QBR] आमेन, आमेन. [PE]