1. {देवप्राप्तीचा ध्यास} PS जशी हरिणी पाण्याच्या प्रवाहासाठी धापा टाकते,
तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकतो. |
3. जेव्हा माझे शत्रू नेहमी मला म्हणतात की, “तुझा देव कोठे आहे?”
तेव्हा रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे. |
4. हर्षानादाने आणि स्तुती करत, सण साजरा करणाऱ्या पुष्कळांबरोबर,
कसा मी त्या गर्दीला नेतृत्व करत देवाच्या घरात घेऊन जात असे, हे आठवून माझा जीव माझ्याठायी ओतला जात आहे. |
5. हे माझ्या जीवा तू निराश का झाला आहेस?
माझ्यामध्ये तू का तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण त्याच्या उपस्थितीने होणाऱ्या तारणामुळे मी त्याची अजून स्तुती करीन. |
6. माझ्या देवा, माझ्याठायी माझा जीव निराश झाला आहे,
म्हणून यार्देनच्या प्रदेशापासून, हर्मोनच्या डोंगराच्या तीन शिखरावरून आणि मिसहारच्या टेकडीवरून मी तुझे स्मरण करतो. |
7. तुझ्या धबधब्याच्या अवाजाने ओघ ओघाला हाक मारतो.
तुझ्या सर्व लहरी आणि मोठ्या लाटा माझ्यावरून गेल्या आहेत. |
8. तरी परमेश्वर त्याची प्रेमदया दिवसा अज्ञापील,
आणि रात्री त्याचे गीत, म्हणजे माझ्या जीवाच्या देवाला केलेली प्रार्थना माझ्यासोबत असेल. |
10. “तुझा देव कुठे आहे?” असे बोलून
माझे शत्रू तलवारीने माझ्या हाडात भोसकल्याप्रमाणे पूर्ण दिवस मला दोष देत राहतात. |
11. हे माझ्या जीवा तू का निराश झाला आहेस?
माझ्यामध्ये तू तळमळत आहेस? देवाची आशा धर, कारण माझ्या मुखाचे तारण आणि माझा देव त्याची अजून मी स्तुती करीन. PE |