1. {#1पूर्वीच्या सुटका आणि हल्लीच्या अडचणी }[PS]*मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे मसकील (शिक्षण) *[PE][QS]हे देवा, आम्ही तुझ्याबद्दल ऐकले आहे. आमच्या वडिलांनी ते आम्हास सांगितले आहे, [QE][QS]की पुरातन दिवसात तू, त्यांच्या दिवसात काय कार्य केलेस. [QE]
2. [QS]तू तुझ्या हाताने राष्ट्रांना घालवून दिलेस, [QE][QS]परंतु आपल्या लोकांस स्थापिले, [QE][QS]तू लोकांस पीडले [QE][QS]परंतु आपल्या लोकांस तू वाढवले. [QE]
3. [QS]कारण त्यांनी आपल्या तलवारीने देश मिळवला नाही. [QE][QS]आणि त्यांच्या बाहूंनी त्यांना तारले नाही. [QE][QS]परंतू तुझा उजवा हात, तुझा भुज, तुझ्या मुखाच्या प्रकाशाने त्यांना तारले, [QE][QS]कारण तू त्यांच्यावर अनुकूल होतास. [QE]
4. [QS]देवा, तू माझा राजा आहेस, [QE][QS]याकोबाला विजय मिळावा म्हणून आज्ञा दे. [QE]
5. [QS]तुझ्या मदतीने आम्ही शत्रूला मागे ढकलू. [QE][QS]जे आमच्याविरूद्ध उठतात, तुझ्या नावाने आम्ही आमच्या शत्रूंना तुडवून टाकू. [QE]
6. [QS]कारण माझ्या धनुष्यबाणांवर माझा विश्वास नाही. [QE][QS]किंवा माझी तलवार मला वाचवू शकेल. [QE]
7. [QS]परंतु तू आम्हांला आमच्या शत्रूंपासून वाचवले आहेस. [QE][QS]आणि जे आमचा द्वेष करतात त्यांना लाजवले आहेस. [QE]
8. [QS]देवाच्या ठायी रोज आम्ही आमचा अभिमान बाळगला आहे, [QE][QS]आणि तुझ्या नावाला आम्ही सर्वकाळ महिमा देऊ. (सेला) [QE]
9. [QS]परंतु आता तू आम्हास फेकून दिले आहे, [QE][QS]आणि आमची अप्रतिष्ठा होऊ दिली आहे. [QE][QS]आणि तू आमच्या सैन्यासोबत पुढे जात नाहीस. [QE]
10. [QS]तू आमच्या शत्रूंपुढे आम्हास मागे हटण्यास लावले, [QE][QS]आणि आमचा द्वेष करणारे त्यांच्यासाठी लूट घेतात. [QE]
11. [QS]तू आम्हास भक्ष्याकरता योजलेल्या मेंढ्यासारखे केले आहे, [QE][QS]आणि आम्हास देशात विखरून टाकले आहेस. [QE]
12. [QS]तू तुझ्या लोकांस कवडीमोलाने विकलेस, [QE][QS]आणि असे करून तू आपली संपत्ती देखील वाढवली नाही. [QE]
13. [QS]तू शेजाऱ्यांमध्ये आम्हांस निंदा आणि [QE][QS]आमच्या सभोवती असणाऱ्यांमध्ये आम्हांस हसण्याजोगे आणि थट्टा असे केले आहे. [QE]
14. [QS]राष्ट्रांमध्ये तू आम्हास अपमान असे केले आहे, [QE][QS]लोक आम्हास बघून आपले डोके हलवतात. [QE]
15. [QS]सर्व दिवस माझी अप्रतिष्ठा माझ्या समोर असते. [QE][QS]आणि माझ्या मुखावरच्या लज्जेने मला झाकले आहे. [QE]
16. [QS]कारण माझ्या निंदकाच्या आणि अपमानाच्या शब्दाने, [QE][QS]शत्रू आणि सुड घेणाऱ्यांमुळे माझे मुख लज्जेने झाकले आहे. [QE]
17. [QS]हे सर्व आमच्यावर आले आहे, तरी आम्ही तुला विसरलो नाही, [QE][QS]किंवा करारांत खोटे वागलो नाही. [QE]
18. [QS]आमचे हृदय मागे फिरले नाही, [QE][QS]आमची पावले तुझ्यापासून दूर गेली नाहीस. [QE]
19. [QS]तरी तू आम्हास कोल्हे राहतात त्या जागेत चिरडलेस, [QE][QS]आणि मृत्यूछायेने आम्हास झाकले आहेस. [QE]
20. [QS]जर आम्ही आमच्या देवाचे नाव विसरलो असेल [QE][QS]किंवा आमचे हात अनोळखी देवाकडे पसरवले असतील, [QE]
21. [QS]तर देव हे शोधून काढणार नाही काय? [QE][QS]कारण तो हृदयातील गुप्त गोष्टी जाणतो. [QE]
22. [QS]खरोखर, आम्ही दिवसभर तुझ्यासाठी मारले जात आहोत. [QE][QS]मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत. [QE]
23. [QS]प्रभू, ऊठ तू का झोपला आहेस? [QE][QS]ऊठ, आम्हास कायमचा सोडून जाऊ नकोस. [QE]
24. [QS]तू आमच्यापासून आपले मुख का लपवतोस? [QE][QS]आणि आमचे दु:ख आणि आमच्यावरचे जुलूम तू का विसरतोस? [QE]
25. [QS]कारण आमचा जीव धुळीस खालपर्यंत गेला आहे, [QE][QS]आणि आमचे पोट भूमीला चिकटले आहे. [QE]
26. [QS]आमच्या साहाय्याला ऊठ! [QE][QS]आणि तुझ्या प्रेमदयेस्तव आम्हास वाचव. [QE]