1. {राजाच्या लग्नासंबंधी गीत} [PS] माझे हृदय चांगल्या विचारांनी भरून वाहते, [QBR] राजासाठी बनवलेली काव्ये मी मोठ्याने वाचेन, [QBR] लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जीभेतून शब्द येतात. [QBR]
2. तू मनुष्याच्या संतानापेक्षा सुंदर आहेस. [QBR] तुझ्या ओठात कृपा ओतलेली आहे, [QBR] यास्तव देवाने तुला सर्वकाळ आशीर्वाद दिला आहे. [QBR]
3. हे बलवाना, तू आपली तलवार मांडीला बांध, [QBR] आपले वैभव आणि आपला प्रताप धारण कर. [QBR]
4. तू आपल्या सत्याने, नम्रतेने, न्यायीपणामध्ये विजयाने स्वारी कर, [QBR] तुझा उजवा हात तुला भयानक गोष्टी शिकवेल. [QBR]
5. तुझे बाण तीक्ष्ण आहेत. [QBR] लोक तुझ्या पायाखाली पडतील. [QBR] तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात आहेत. [QBR]
6. देवा तुझे सिंहासन सर्वकाळासाठी आहे. [QBR] तुझा न्यायाचा राजदंड हा तुझ्या राज्याचा राजदंड आहे. [QBR]
7. तू न्यायीपणावर प्रीती केली आणि दुष्टाईचा हेवा केला. [QBR] यास्तव देवाने, तुझ्या देवाने, हर्षाच्या तेलाने तुला तुझ्या सोबत्यांपेक्षा अधीक अभिषेक केल आहे. [QBR]
8. तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरू, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो. [QBR] हस्तिदंताच्या महालातून तंतुवाद्यांनी तुला आनंदीत केले आहे. [QBR]
9. राजांच्या मुली तुझ्या सन्मान्य स्रीयांच्यामध्ये आहेत. [QBR] राणी ओफिराच्या सोन्याने शृंगारलेली तुझ्या उजव्या बाजूस उभी आहे. [QBR]
10. मुली, लक्षपूर्वक ऐक, विचार कर, आपला कान लाव. [QBR] तुझी माणसे आणि तुझ्या वडीलांच्या घराला विसरून जा. [QBR]
11. अशाने राजा तुझ्या सौंदर्याची आवड धरणार, [QBR] तो तुझा स्वामी आहे, तू त्याचा आदर कर. [QBR]
12. सोराची कन्या तुझ्यासाठी भेट आणील. [QBR] श्रीमंतातील लोक तुला भेटायची इच्छा धरतील. [QBR]
13. राजकन्या राजमहालात तेजस्वी आहे, [QBR] तिचे वस्र सोन्याच्या कारागिरीचे आहेत. [QBR]
14. तिला कशिदाकाम केलेल्या वस्त्रांमध्ये राजाकडे नेले जाईल. [QBR] तिच्या मागे चालणाऱ्या तिच्या सोबतिणी कुमारी तुझ्याजवळ आणल्या जातील. [QBR]
15. ते आनंदात व हर्षात नेल्या जातील. [QBR] ते राजाच्या महालात प्रवेश करतील. [QBR]
16. तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले राज्य करतील. [QBR] ज्यांना तू सर्व पृथ्वीत अधिपती करशील. [QBR]
17. तुझे नाव सर्व पिढ्या आठवतील असे मी करीन. [QBR] म्हणून लोक सदासर्वकाळ तुझी स्तुती करतील. [PE]