1. {#1राजाच्या लग्नासंबंधी गीत }[PS]*मुख्य गायकासाठी; कोरहाच्या मुलांचे शोशन्नीम (म्हणजे भूकमले) या नावाच्या रागावर बसवलेले मस्कील (शिक्षण) प्रीतीचे स्तोत्र. *[PE][QS]माझे हृदय चांगल्या विचारांनी भरून वाहते, [QE][QS]राजासाठी बनवलेली काव्ये मी मोठ्याने वाचेन, [QE][QS]लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जीभेतून शब्द येतात. [QE]
2. [QS]तू मनुष्याच्या संतानापेक्षा सुंदर आहेस. [QE][QS]तुझ्या ओठात कृपा ओतलेली आहे, [QE][QS]यास्तव देवाने तुला सर्वकाळ आशीर्वाद दिला आहे. [QE]
3. [QS]हे बलवाना, तू आपली तलवार मांडीला बांध, [QE][QS]आपले वैभव आणि आपला प्रताप धारण कर. [QE]
4. [QS]तू आपल्या सत्याने, नम्रतेने, न्यायीपणामध्ये विजयाने स्वारी कर, [QE][QS]तुझा उजवा हात तुला भयानक गोष्टी शिकवेल. [QE]
5. [QS]तुझे बाण तीक्ष्ण आहेत. [QE][QS]लोक तुझ्या पायाखाली पडतील. [QE][QS]तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात आहेत. [QE]
6. [QS]देवा तुझे सिंहासन सर्वकाळासाठी आहे. [QE][QS]तुझा न्यायाचा राजदंड हा तुझ्या राज्याचा राजदंड आहे. [QE]
7. [QS]तू न्यायीपणावर प्रीती केली आणि दुष्टाईचा हेवा केला. [QE][QS]यास्तव देवाने, तुझ्या देवाने, हर्षाच्या तेलाने तुला तुझ्या सोबत्यांपेक्षा अधीक अभिषेक केल आहे. [QE]
8. [QS]तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरू, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो. [QE][QS]हस्तिदंताच्या महालातून तंतुवाद्यांनी तुला आनंदीत केले आहे. [QE]
9. [QS]राजांच्या मुली तुझ्या सन्मान्य स्रीयांच्यामध्ये आहेत. [QE][QS]राणी ओफिराच्या सोन्याने शृंगारलेली तुझ्या उजव्या बाजूस उभी आहे. [QE]
10. [QS]मुली, लक्षपूर्वक ऐक, विचार कर, आपला कान लाव. [QE][QS]तुझी माणसे आणि तुझ्या वडीलांच्या घराला विसरून जा. [QE]
11. [QS]अशाने राजा तुझ्या सौंदर्याची आवड धरणार, [QE][QS]तो तुझा स्वामी आहे, तू त्याचा आदर कर. [QE]
12. [QS]सोराची कन्या तुझ्यासाठी भेट आणील. [QE][QS]श्रीमंतातील लोक तुला भेटायची इच्छा धरतील. [QE]
13. [QS]राजकन्या राजमहालात तेजस्वी आहे, [QE][QS]तिचे वस्र सोन्याच्या कारागिरीचे आहेत. [QE]
14. [QS]तिला कशिदाकाम केलेल्या वस्त्रांमध्ये राजाकडे नेले जाईल. [QE][QS]तिच्या मागे चालणाऱ्या तिच्या सोबतिणी कुमारी तुझ्याजवळ आणल्या जातील. [QE]
15. [QS]ते आनंदात व हर्षात नेल्या जातील. [QE][QS]ते राजाच्या महालात प्रवेश करतील. [QE]
16. [QS]तुझ्या वडिलांच्या ठिकाणी तुझी मुले राज्य करतील. [QE][QS]ज्यांना तू सर्व पृथ्वीत अधिपती करशील. [QE]
17. [QS]तुझे नाव सर्व पिढ्या आठवतील असे मी करीन. [QE][QS]म्हणून लोक सदासर्वकाळ तुझी स्तुती करतील. [QE]