1. {देव अखिल पृथ्वीचा राजा} [PS] अहो सर्व लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. [QBR] विजयोत्सवाने देवाचा जयजयकार करा. [QBR]
2. कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे; [QBR] तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे. [QBR]
3. तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, [QBR] आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो. [QBR]
4. त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे, [QBR] ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे. [QBR]
5. जयघोष होत असता देव वर गेला, [QBR] परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला. [QBR]
6. देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा; [QBR] आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा. [QBR]
7. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; [QBR] त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा. [QBR]
8. देव राष्ट्रांवर राज्य करतो; [QBR] देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे. [QBR]
9. अब्राहामाच्या देवाच्या लोकांचे अधिपती एकत्र जमले आहेत; [QBR] कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. [QBR] तो अत्यंत उंच आहे. [PE]