1. {#1सीयोनेचे सौंदर्य व वैभव }[PS]*कोरहाच्या पुत्राचे स्तोत्रगीत. *[PE][QS]आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र पर्वतावर, [QE][QS]परमेश्वर थोर आणि परमस्तुत्य आहे. [QE]
2. [QS]सियोन डोंगर, जो थोर राजाची नगरी आहे, पृथ्वीच्या बाजूस आहे, [QE][QS]त्याचे सौंदर्य उच्चतेवर, सर्व पृथ्वीवर आनंद आणते. [QE]
3. [QS]देवाने तिच्या राजमहालांमध्ये आपणास आश्रयदुर्ग असे प्रगट केले आहे. [QE]
4. [QS]कारण, पाहा, राजे एकत्र येत आहेत, [QE][QS]ते एकत्र येऊन चढाई करून आले. [QE]
5. [QS]त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले. [QE][QS]ते निराश झाले आणि पळत सुटले. [QE]
6. [QS]भयाने त्यांना गाठले, भीतीने त्यांचा थरकाप झाला. [QE][QS]प्रसवणाऱ्या स्रीच्या वेदनांप्रमाणे त्यांना वेदना लागल्या. [QE]
7. [QS]पूर्वेकडच्या वाऱ्याने [QE][QS]तू तार्शीशाची जहाजे मोडलीस. [QE]
8. [QS]होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नगरात, [QE][QS]आमच्या देवाच्या नगरात घडत असलेले पाहिले. [QE][QS]देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो. [QE]
9. [QS]देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमदयेचा विचार करतो. [QE]
10. [QS]देवा, जसे तुझे नाव आहे, [QE][QS]तशी तुझी किर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत आहे. [QE]
11. [QS]तुझ्या न्याय कृत्यांमुळे, सियोन पर्वत आनंद करो, [QE][QS]यहूदाची कन्या हर्ष करोत. [QE]
12. [QS]सियोने भोवती फिरा, शहर बघा, तिचे बुरुज मोजा. [QE]
13. [QS]उंच भिंती बघा, सियोनेच्या राजवाड्याचे वर्णन करा. [QE][QS]नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल. [QE]
14. [QS]कारण हा देव, आमचा देव, सदासर्वकाळ आहे. [QE][QS]तो सर्वकाळ आमचा मार्गदर्शक होईल. [QE]