3. परमेश्वरा, सकाळी तू माझे रडणे ऐकशील,
सकाळी मी माझी विनंती * अर्पणे तुझ्याकडे व्यवस्थीत रीतीने मांडीन व अपेक्षेने वाट पाहीन. |
7. पण मी तर तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने तुझ्या घरांत प्रवेश करीन,
मी पवित्र मंदिरात तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नमन करीन. |
9. कारण त्यांच्या मुखात काही सत्य नाही,
त्यांचे अंतर्याम दुष्टपणच आहे. त्यांचा गळा उघडे थडगे आहे, ते आपल्या जीभेने आर्जव करतात. |
10. देवा, त्यांना अपराधी घोषीत कर,
त्यांच्याच योजना त्यांना पडण्यास कारणीभूत ठरो. तू त्यांना त्यांच्या असंख्य गुन्ह्यांबद्दल घालवून दे. कारण त्यांनी तुझ्याविरूद्ध बंड केले आहे. |
11. परंतु जे सर्व तुझ्यामध्ये आश्रय घेतात ते हर्ष करोत.
ते कायमचे हर्षोनाद करो, कारण तू त्यांचे रक्षण करतोस. ज्यांना तुझे नाव प्रिय आहे, ते तुझ्यामध्ये आनंद करोत. |