1. {#1संरक्षणासाठी प्रार्थना }[PS]*मुख्य वाजंत्र्यासाठी; वाजंत्र्याच्या साथीने गायचे दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]हे परमेश्वरा, माझे बोलणे ऐक. [QE][QS]माझे कण्हणे विचारात घे. [QE]
2. [QS]माझ्या देवा! माझ्या राजा! माझ्या रडण्याच्या शब्दाकडे कान दे, कारण मी तुझी प्रार्थना करीत आहे. [QE]
3. [QS]परमेश्वरा, सकाळी तू माझे रडणे ऐकशील, [QE][QS]सकाळी मी माझी विनंती [* अर्पणे ]तुझ्याकडे व्यवस्थीत रीतीने मांडीन व अपेक्षेने वाट पाहीन. [QE]
4. [QS]खचित तू असा देव आहेस, जो वाईटाला संमती देत नाही. [QE][QS]दुर्जन लोकांचे तू स्वागत करीत नाहीस. [QE]
5. [QS]गर्विष्ठ तुझ्या उपस्थीतीत उभे राहणार नाहीत, दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा तू द्वेष करतो. [QE]
6. [QS]खोट बोलणाऱ्याचा तू सर्वनाश करतोस; [QE][QS]परमेश्वर हिंसक आणि कपटी मनुष्याचा तिरस्कार करतो. [QE]
7. [QS]पण मी तर तुझ्या प्रेमदयेच्या विपुलतेने तुझ्या घरांत प्रवेश करीन, [QE][QS]मी पवित्र मंदिरात तुझ्याबद्दलच्या आदरापोटी नमन करीन. [QE]
8. [QS]हे प्रभू, माझ्या शत्रूंमुळे तू आपल्या न्यायीपणात मला चालव, [QE][QS]तुझे मार्ग माझ्या समोर सरळ कर. [QE]
9. [QS]कारण त्यांच्या मुखात काही सत्य नाही, [QE][QS]त्यांचे अंतर्याम दुष्टपणच आहे. [QE][QS]त्यांचा गळा उघडे थडगे आहे, [QE][QS]ते आपल्या जीभेने आर्जव करतात. [QE]
10. [QS]देवा, त्यांना अपराधी घोषीत कर, [QE][QS]त्यांच्याच योजना त्यांना पडण्यास कारणीभूत ठरो. [QE][QS]तू त्यांना त्यांच्या असंख्य गुन्ह्यांबद्दल घालवून दे. [QE][QS]कारण त्यांनी तुझ्याविरूद्ध बंड केले आहे. [QE]
11. [QS]परंतु जे सर्व तुझ्यामध्ये आश्रय घेतात ते हर्ष करोत. [QE][QS]ते कायमचे हर्षोनाद करो, कारण तू त्यांचे रक्षण करतोस. [QE][QS]ज्यांना तुझे नाव प्रिय आहे, ते तुझ्यामध्ये आनंद करोत. [QE]
12. [QS]कारण तुच धार्मिकाला आशीर्वाद देतोस, हे परमेश्वरा, तू तुझ्या कृपेच्या ढालीने यांना वाढवतोस. [QE]