1. {#1देव न्यायाधीश आहे }[PS]*आसाफाचे स्तोत्र. *[PE][QS]थोर परमेश्वर देव, बोलला आहे. [QE][QS]आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत हाक मारली. [QE]
2. [QS]सौंदर्य परिपूर्णता सियोनेमधून [QE][QS]देव प्रकाशला आहे. [QE]
3. [QS]आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही, [QE][QS]त्याच्यासमोर आग नाश करत चालली आहे, [QE][QS]आणि त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे. [QE]
4. [QS]त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली, [QE][QS]म्हणजे तो त्याच्या लोकांचा न्यायनिवाडा करील. [QE]
5. [QS]देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा. [QE][QS]ज्यांनी यज्ञाच्या व्दारे माझ्याशी करार केला आहे.” [QE]
6. [QS]आकाश त्याच्या चांगुलपणाविषयी सांगत असते. [QE][QS]कारण देव स्वतः न्यायधीश आहे. [QE]
7. [QS]हे माझ्या लोकांनो, ऐका, आणि मी बोलेन, [QE][QS]मी देव आहे, तुमचा देव आहे. [QE]
8. [QS]मी तुमच्या होमार्पणाबद्दल तक्रार करीत नाही. [QE][QS]तुमची होमार्पणे निरंतर माझ्यापुढे आहेत, [QE]
9. [QS]मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही. [QE][QS]किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही. [QE]
10. [QS]कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे, [QE][QS]हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत. [QE]
11. [QS]उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे [QE][QS]आणि भूमीवरील वन्य पशू माझे आहेत. [QE]
12. [QS]मी भुकेला असलो तरी तुला बोलणार नाही, [QE][QS]कारण जग माझेच आहे, आणि त्यातील सर्वकाही माझेच आहे. [QE]
13. [QS]मी बैलाचे मांस खाणार का? [QE][QS]मी बकऱ्यांचे रक्त पिणार का? [QE]
14. [QS]देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर, [QE][QS]आणि परत्पराकडे आपले नवस फेड. [QE]
15. [QS]तू संकटात असता मला हाक मार, [QE][QS]आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील. [QE]
16. [QS]देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे? [QE][QS]आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस? [QE]
17. [QS]कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस, [QE][QS]आणि माझी वचने झुगारून देतोस? [QE]
18. [QS]तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता. [QE][QS]तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता. [QE]
19. [QS]तू वाईटाला आपले मुख देतोस, [QE][QS]आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते. [QE]
20. [QS]तुम्ही बसता आणि आपल्या भावाविरूद्ध बोलता. [QE][QS]तू आपल्या सख्या भावाची निंदा करतोस. [QE]
21. [QS]तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प राहिलो. [QE][QS]मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले, [QE][QS]परंतू मी तुझा निषेध करणार आणि तुझ्या डोळ्यापुढे ओळीने सर्वकाही मांडणार. [QE]
22. [QS]तुम्ही लोक देवाला विसरला आहात. [QE][QS]मी तुम्हास फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हास कोणीही वाचवू शकणार नाही. [QE]
23. [QS]जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो, [QE][QS]आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो, [QE][QS]त्यास मी देवाचे तारण दाखवेन. [QE]