1. {#1शुद्धतेसाठी प्रार्थना }[PS]*मुख्य गायकासाठी; दाविदाचे स्तोत्र; जेव्हा तो बथशेबापाशी गेल्यानंतर नाथान भविष्यवादी त्याच्याकडे आला तेव्हाचे. *[PE][QS]हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर, [QE][QS]तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक. [QE]
2. [QS]देवा माझे अपराध धुऊन टाक, [QE][QS]आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर. [QE]
3. [QS]कारण माझे अपराध मला माहित आहेत. [QE][QS]आणि माझी पातके नित्य माझ्यासमोर आहेत. [QE]
4. [QS]तुझ्याविरूद्ध, फक्त तुझ्याविरूद्ध मी पाप केले आहे, [QE][QS]आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. [QE][QS]जेव्हा तू बोलतोस तर तू सत्य बोलतो. [QE][QS]तू न्याय करतो तेव्हा योग्य करतो. [QE]
5. [QS]पाहा! मी जन्मापासूनच पापी आहे, [QE][QS]आणि पापांतच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला. [QE]
6. [QS]पाहा! तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतो, [QE][QS]तू माझ्या हृदयास ज्ञानाची ओळख करून दे. [QE]
7. [QS]मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर, [QE][QS]मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन. [QE]
8. [QS]आनंद व हर्ष मला ऐकू दे, [QE][QS]म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील. [QE]
9. [QS]माझ्या पापांकडे बघू नकोस, [QE][QS]माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक. [QE]
10. [QS]देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर. [QE][QS]आणि माझ्या मध्ये स्थीर असा आत्मा पुन्हा घाल. [QE]
11. [QS]तुझ्या उपस्थितीतून मला दूर लोटू नकोस, [QE][QS]आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस. [QE]
12. [QS]तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे, [QE][QS]आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर. [QE]
13. [QS]तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविन [QE][QS]आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील. [QE]
14. [QS]हे माझ्या तारणाऱ्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला क्षमा कर, [QE][QS]आणि मी तुझ्या न्यायीपणाबद्दल मोठ्याने ओरडेन. [QE]
15. [QS]प्रभू, माझे ओठ उघड, [QE][QS]आणि माझे तोंड तुझी स्तुती वर्णन करेल. [QE]
16. [QS]कारण यज्ञाची आवड तुला नाही, [QE][QS]नाहीतर मी ते दिले असते, [QE][QS]होमार्पणाने तुला संतोष होत नाही. [QE]
17. [QS]देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय, [QE][QS]तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. [QE]
18. [QS]हे देवा, तू प्रसन्न होऊन सियोनेचे चांगले कर. [QE][QS]आणि यरूशलेमेच्या भींती पुन्हा बांध. [QE]
19. [QS]तेव्हा न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पणे, आणि सकल होमार्पणे तुला आवडतील. [QE][QS]तेव्हा तुझ्या वेदीवर बैल अर्पिले जातील. [QE]