1. {शुद्धतेसाठी प्रार्थना} [PS] हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर, [QBR] तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक. [QBR]
2. देवा माझे अपराध धुऊन टाक, [QBR] आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर. [QBR]
3. कारण माझे अपराध मला माहित आहेत. [QBR] आणि माझी पातके नित्य माझ्यासमोर आहेत. [QBR]
4. तुझ्याविरूद्ध, फक्त तुझ्याविरूद्ध मी पाप केले आहे, [QBR] आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. [QBR] जेव्हा तू बोलतोस तर तू सत्य बोलतो. [QBR] तू न्याय करतो तेव्हा योग्य करतो. [QBR]
5. पाहा! मी जन्मापासूनच पापी आहे, [QBR] आणि पापांतच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला. [QBR]
6. पाहा! तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतो, [QBR] तू माझ्या हृदयास ज्ञानाची ओळख करून दे. [QBR]
7. मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर, [QBR] मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन. [QBR]
8. आनंद व हर्ष मला ऐकू दे, [QBR] म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील. [QBR]
9. माझ्या पापांकडे बघू नकोस, [QBR] माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक. [QBR]
10. देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर. [QBR] आणि माझ्या मध्ये स्थीर असा आत्मा पुन्हा घाल. [QBR]
11. तुझ्या उपस्थितीतून मला दूर लोटू नकोस, [QBR] आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस. [QBR]
12. तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे, [QBR] आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर. [QBR]
13. तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविन [QBR] आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील. [QBR]
14. हे माझ्या तारणाऱ्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला क्षमा कर, [QBR] आणि मी तुझ्या न्यायीपणाबद्दल मोठ्याने ओरडेन. [QBR]
15. प्रभू, माझे ओठ उघड, [QBR] आणि माझे तोंड तुझी स्तुती वर्णन करेल. [QBR]
16. कारण यज्ञाची आवड तुला नाही, [QBR] नाहीतर मी ते दिले असते, [QBR] होमार्पणाने तुला संतोष होत नाही. [QBR]
17. देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय, [QBR] तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. [QBR]
18. हे देवा, तू प्रसन्न होऊन सियोनेचे चांगले कर. [QBR] आणि यरूशलेमेच्या भींती पुन्हा बांध. [QBR]
19. तेव्हा न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पणे, आणि सकल होमार्पणे तुला आवडतील. [QBR] तेव्हा तुझ्या वेदीवर बैल अर्पिले जातील. [PE]