1. {विश्वासघातक्यांचा नाश व्हावा म्हणून प्रार्थना} PS हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान लाव,
आणि माझ्या विणवनीपासून लपू नकोस. |
3. माझ्या शत्रूंच्या आवाजामुळे,
दुष्टाच्या जुलूमामुळे मी कण्हत आहे, कारण ते माझ्यावर संकट आणतात, आणि द्वेषात माझा पाठलाग करतात. |
9. प्रभू, त्यांना नाश कर, आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण कर.
कारण मी शहरात हिंसा आणि भांडणे पाहिली आहेत. |
12. कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर
तर मला कळून आले असते, किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरूद्ध उठला असता, तर मी स्वतःला त्याजपासून लपवले असते. |
15. मृत्यू त्यांच्यावर अकस्मात येवो.
जीवंतपणी ते मृतलोकांत खाली जावोत. कारण त्यांच्या जगण्यात दुष्टपण आहे. |
18. माझ्याविरूद्ध लढाणाऱ्यांपासून त्याने मला खंडूण, माझा जीव शांततेत ठेवला आहे.
कारण माझ्याविरूद्ध लढणारे पुष्कळ होते. |
19. देव, जो पुरातन काळापासून आहे,
तो ऐकणार आणि त्यांना प्रतिसाद देणार, (सेला) ते मनुष्ये बदलत नाहीत; ती देवाला भीत नाहीत. |
20. माझ्या मित्रांनी त्याच्या सोबत शांतीने राहणाऱ्यांवर आपला हात उगारला आहे.
त्याने आपला करार मोडला आहे. |
21. त्यांचे तोंड लोण्यासारखे आहे,
परंतू त्याचे हृदय शत्रुत्व करणारेच आहे. त्यांचे शब्द तेलापेक्षा बुळ्बुळीतआहेत, तरी ते बाहेर काढलेल्या तलवारी सारखे आहे. |
23. परंतू हे देवा, तू त्यांना नाशाच्या खांचेत पाडून टाकशील;
घातकी आणि कपटी मनुष्ये आपले अर्धे आयुष्यही जगणार नाहीत, परंतू मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. PE |