1. {#1विश्वासघातक्यांचा नाश व्हावा म्हणून प्रार्थना }[PS]*मुख्य गायकासाठी; तंतूवाद्दावरचे दाविदाचे स्तोत्र. *[PE][QS]हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान लाव, [QE][QS]आणि माझ्या विणवनीपासून लपू नकोस. [QE]
2. [QS]देवा, माझ्याकडे लक्ष लाव आणि मला उत्तर दे [QE][QS]माझ्या संकटात मला विसावा नाही. [QE]
3. [QS]माझ्या शत्रूंच्या आवाजामुळे, [QE][QS]दुष्टाच्या जुलूमामुळे मी कण्हत आहे, [QE][QS]कारण ते माझ्यावर संकट आणतात, [QE][QS]आणि द्वेषात माझा पाठलाग करतात. [QE]
4. [QS]माझे हृदय फार दुखणाईत आहे, [QE][QS]आणि मृत्यूचे भय माझ्यावर येऊन पडले आहे. [QE]
5. [QS]भय आणि थरथरने माझ्यावर आली आहेत, [QE][QS]आणि भयाने मला ग्रासले आहे. [QE]
6. [QS]मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते. [QE][QS]मी दूर उडून गेलो असतो आणि स्वस्थ राहिलो असतो. [QE]
7. [QS]मी खूप दूर भटकत गेलो असतो. [QE][QS]मी रानात राहिलो असतो. [QE]
8. [QS]वादळी वाऱ्यापासून मला आश्रय मिळावा म्हणून मी लवकर पळालो असतो. [QE]
9. [QS]प्रभू, त्यांना नाश कर, आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण कर. [QE][QS]कारण मी शहरात हिंसा आणि भांडणे पाहिली आहेत. [QE]
10. [QS]दिवस रात्र ते भींतीवर चढून जातात; [QE][QS]अपराध आणि अनर्थ तिच्यामध्ये आहेत. [QE]
11. [QS]दुष्टपणा तिच्यामध्ये कार्य करत आहे, [QE][QS]जुलूम आणि कपट कधीही तिच्या रस्त्यांना सोडत नाही. [QE]
12. [QS]कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर [QE][QS]तर मला कळून आले असते, [QE][QS]किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरूद्ध उठला असता, [QE][QS]तर मी स्वतःला त्याजपासून लपवले असते. [QE]
13. [QS]परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस, [QE][QS]माझा मित्र, माझा साथीदार, माझा दोस्त. [QE]
14. [QS]एकमेकांसोबत आपली गोड सहभागिता होती. [QE][QS]आपण समुदायांबरोबर चालत देवाच्या घरात जात होतो. [QE]
15. [QS]मृत्यू त्यांच्यावर अकस्मात येवो. [QE][QS]जीवंतपणी ते मृतलोकांत खाली जावोत. [QE][QS]कारण त्यांच्या जगण्यात दुष्टपण आहे. [QE]
16. [QS]मी तर देवाला हाक मारीन, [QE][QS]आणि परमेश्वर मला तारील. [QE]
17. [QS]मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपले गाऱ्हाणे करेन आणि कण्हेन. [QE][QS]आणि तो माझी वाणी ऐकेल. [QE]
18. [QS]माझ्याविरूद्ध लढाणाऱ्यांपासून त्याने मला खंडूण, माझा जीव शांततेत ठेवला आहे. [QE][QS]कारण माझ्याविरूद्ध लढणारे पुष्कळ होते. [QE]
19. [QS]देव, जो पुरातन काळापासून आहे, [QE][QS]तो ऐकणार आणि त्यांना प्रतिसाद देणार, (सेला) [QE][QS]ते मनुष्ये बदलत नाहीत; [QE][QS]ती देवाला भीत नाहीत. [QE]
20. [QS]माझ्या मित्रांनी त्याच्या सोबत शांतीने राहणाऱ्यांवर आपला हात उगारला आहे. [QE][QS]त्याने आपला करार मोडला आहे. [QE]
21. [QS]त्यांचे तोंड लोण्यासारखे आहे, [QE][QS]परंतू त्याचे हृदय शत्रुत्व करणारेच आहे. [QE][QS]त्यांचे शब्द तेलापेक्षा बुळ्बुळीतआहेत, [QE][QS]तरी ते बाहेर काढलेल्या तलवारी सारखे आहे. [QE]
22. [QS]तू आपला भार परमेश्वरावर टाक, [QE][QS]म्हणजे तो तुला आधार देईल. [QE][QS]तो नितीमानाला कधी पडू देणार नाही. [QE]
23. [QS]परंतू हे देवा, तू त्यांना नाशाच्या खांचेत पाडून टाकशील; [QE][QS]घातकी आणि कपटी मनुष्ये आपले अर्धे आयुष्यही जगणार नाहीत, [QE][QS]परंतू मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. [QE]